मुंबई

नैनाबाधित क्षेत्रात समर्थकांची फलकबाजी

CD

नवीन पनवेल, ता. १४ (वार्ताहर) ः दोन दिवसांपूर्वीच नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीने नैनाचा भूखंडवाटप कार्यक्रम उधळून लावला. शनिवारी मध्यरात्री नैना समर्थनार्थ चार गावांत फलकबाजी केल्यामुळे नैनाबाधित गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. नैना प्रकल्पबाधित उत्कर्ष समितीचे सचिव राजेश केणी यांनी अज्ञात फलकबाजी करणाऱ्यांविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. देवद येथील जय हनुमान क्रिकेट मैदान येथे नैनातर्फे प्लॉट हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलनाला सुरुवात केली व प्लॉट हस्तांतरण कार्यक्रमाला जाहीर विरोध केला. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता प्लॉट हस्तांतरणाचा कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा बोलावण्यात आला. या वेळी शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवत हा कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली. या घटनेला दोन दिवसही झाले नाहीत, तोपर्यंत नैनाबाधित गावामध्ये नैनाच्या समर्थनार्थ फलक लागल्याने गावांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT