मुंबई

वृक्ष छाटणीसाठी २५ मे ची डेडलाईन

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : पावसाळ्यात झाडे उन्मळून आणि फांद्या तुटून होणारे नुकसान टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने वृक्षछाटणीची मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीचे चार ते पाच विभाग करून एकेका विभागातील धोकादायक फांद्या तोडण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी उद्यान विभागाला दिले आहेत. इतकेच नव्हे, तर या वृक्षछाटणीसाठी पुढील दहा दिवसांची म्हणजे २५ मेची डेडलाईन दिली असून खांद्या तोडताना झाडांना नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
ठाणे शहर दुतर्फा झाडांनी नटलेले आहे. मात्र ही हरितछाया दरपावसाळ्यात ठाणेकरांच्या मुळावर उठते. दरवर्षी पावसाळ्यात किमान २०० झाडे उन्हाळून पडतात किंवा तितक्याच संख्येने फांद्यांची पडझड होते. या पडझडीमुळे गेल्या वर्षी जीवितहानीलाही सामोरे जावे लागले. त्यामुळे अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पावसाळापूर्व वृक्षछाटणीसंदर्भात उद्यान विभागाचे बैठक घेतली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात धोकादायक फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या उद्यान विभागाच्या बैठकीत, झाडांच्या फांद्या तोडण्याच्या तक्रारी केल्या तरी त्यावर कारवाई होत नाही, असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळत असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
पाच छोटे विभाग करावेत. एकेका विभागातील झाडांच्या धोकादायक फांद्या तोडल्या जाव्यात. एकेक विभाग पूर्ण झाला की तसा अहवाल सादर करावा. या कामासाठी २५ मेही कालमर्यादा असेल. तोवर शहरातील झाडांच्या सर्व धोकादायक फांद्या तोडल्या गेलेल्या असाव्यात, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले.
झाडांच्या फांद्या तोडताना, ‘ट्री ट्रिमिंग’ म्हणजे ‘ट्री कटींग’ नाही. या दोन्ही गोष्टींमध्ये मुलभूत फरक आहे. हे कायम लक्षात ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत झाड उद्ध्वस्त होता कामा नये. त्याचवेळी, पावसाळ्यापूर्वी सर्व ठिकाणच्या धोकादायक फांद्या काढण्यात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
.....
पथदिव्यांचीही सफाई करा!
झाडांच्या धोकादायक फांद्यांबाबत वाहतूक पोलिसांनी केलेल्या सूचनाही उद्यान विभागाने लक्षात घ्याव्यात. तसेच, फांद्या तोडताना झाडाचा तोल जाणार नाही, अशा पद्धतीने काम करावे. सुकलेली झाडे, झुकलेली झाडे, धोकादायक फांद्या काढत असताना झाकोळले गेलेल्या पथदिव्यांचीही सफाई करावी. त्यासाठी आवश्यक तेवढ्याच फांद्या तोडल्या जाव्यात इत्यादी सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
....
जाहिरात होर्डिंगसाठी झाडांचा बळी नको
जाहिरातीच्या होर्डिंगसाठी एकाही झाडाला हात लावायचा नाही. होर्डिंगच्या मध्ये झाड येत असेल, तर होर्डिंगची जागा बदला. होर्डिंगमधून मिळणाऱ्या जाहिरात महसुलापेक्षा झाडांचे संरक्षण हे पालिकेचे मूलभूत कर्तव्य आहे. याचे भान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेवावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT