मुंबई

दर्शना धोडी मृत्यूप्रकरणाची चौकशी करा

CD

वाडा, ता. १६ (बातमीदार) : तालुक्यातील कापरी येथील २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह जंगलात एका झाडाला लटकत असताना सोमवारी (ता. १५) निदर्शनास आले. तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अनंता वनगा यांनी पोलिस निरीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.

तालुक्यातील कापरी गावात दर्शना धोडी (वय २२) ही तरुणी कुटुंबासह राहत होती. ती आईसह नजीकच्या फॉर्म हाऊसवर कामाला जात होती, पण ९ मे रोजी ती कामावरून घरी परतलीच नाही. तिची शोधाशोध केली असता ती सापडली नाही. अखेर सोमवारी जंगलात एका झाडाला तिचा मृतदेह लटकत असताना नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला. तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT