मुंबई

एपीएमसीतील वाहनांच्या अतिवेगाला लगाम

CD

तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे चालकांच्या घाईमुळे अनेकदा अपघातही झाले असल्याने वाहनांच्या वेगाला लगाम घालण्यासाठी एपीएमसी वाहतूक पोलिस शाखेने अपघातप्रणव क्षेत्रात सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत.
वाशी, सेक्टर १९ मध्ये असलेल्या या बाजारपेठेत प्रतिदिन हजारोंच्या संख्येने ट्रक आणि टेम्पोंची ये-जा असते. या परिसरात फळ, भाजीपाला, अन्नधान्य, कांदा-बटाटा, मसालेच्या बाजारपेठा आहेत. तसेच एपीएमसीच्या परिसरालगत रहिवासी वस्तीदेखील असल्याने मार्केट तसेच वाशी येथे सर्व दैनंदिन कामासाठी ये-जा करणाऱ्या मार्गांवर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे एपीएमसीकडे येणाऱ्या तिन्ही मार्गावर गतिरोधक बसवणे, सिग्नलच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे, सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती केली आहे.
----------------------------
अवजड वाहनांमुळे किरकोळ अपघात
एपीएमसी मार्केटमधील तुर्भे-वाशी लिंक मार्गावर २४ तास वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच मुंबई आणि उपनगर येथून शेतमाल खरेदीसाठी प्रतिदिन लाखो ग्राहक एपीएमसी मार्केटमध्ये येत असतात. त्यामुळे मार्केटमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत.
-------------------------------------------------
कांदा बटाटा-मार्केट गेट नंबर २ या ठिकाणी जावक गेट मधून मुंबईच्या दिशेने सर्व मालवाहतूक ट्रक व टेम्पो मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात अशातच एपीएमसीचा सिग्नल सुटल्यानंतर अरेंजा कॉर्नरच्या सिग्नलवर थांबायला लागू नये, यासाठी भरधाव वेगाने हलकी वाहने जात असतात. परिणामी, या ठिकाणी वारंवार अपघात होत होते.
- विमल बिडवे, पोलिस निरीक्षक, एपीएमसी वाहतूक शाखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT