मुंबई

विद्यार्थ्यांसाठी यशाचा कानमंत्र

CD

जुईनगर, बातमीदार

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावी-बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी अनेक पर्याय असतात. कारण दहावी किंवा बारावीनंतर जो पर्याय निवडला जातो, त्यावरच भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे अनेक वेळा पालक स्वतःच्या इच्छेनुसार मुलांवर दबाव टाकत मुलाची बौद्धिक क्षमता, भविष्यात येणारी आव्हाने याचा विचार करत नसल्याने केवळ पैसा हा एकच विचार करतात. त्यामुळेच आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडणे गरजेचे झाले असून त्यातूनच मुलांना जीवनातील यशाचा मार्ग मिळणार आहे.
----------------------------------------
दहावीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रम लोकप्रिय आहे. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात. ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात. आपल्याकडे एकदा विद्यार्थी आवडीनुसार क्षेत्र निवडतो. मात्र, त्याचे पाहून अनेक विद्यार्थी त्याच क्षेत्रामध्ये जाणे पसंत करतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना बेरोजगार राहावे लागते. त्यामुळे स्वतःच्या मनाला काय आवडते, त्यानुसार भविष्याचा विचार करून क्षेत्र निवडणे हे फायदेशीर ठरते. दहावीनंतर आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा डिप्लोमासारखे विविध कोर्स उपलब्ध असतात. प्रत्येक क्षेत्र हे नावीन्यपूर्ण असून कोणत्याही क्षेत्रामधून यशस्वी होऊन चांगली नोकरी, पद-प्रतिष्ठा मिळवू शकतो. फक्त स्वतःच्या आवडीनुसार करिअरचे क्षेत्र निवडून मेहनत करणे आवश्यक आहे.
----------------------------------
दहावीनंतरच्या संधी
- आर्ट अॅण्ड क्राफ्ट, सिरॅमिक अॅण्ड पॉटरी, डान्स, ड्रॉइंग, फर्निचर अॅण्ड इंटेरिअर डिझाईन, म्युझिक, स्कल्प्चर, बॅचलर इन डिझायनिंग, प्रोडक्ट डिझाईन, फर्निचर अॅण्ड इंटिरिअर डिझाईन, सिरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन, व्हिडीओ कम्युनिकेशन असे विविध कोर्स उपलब्ध असून त्यासाठी कलेशिवाय कल्पनाशक्तीदेखील महत्त्वाची असते.
- दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात. हा डिप्लोमा कोर्स तीन वर्षांचा असतो. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन आयसी इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन ईसी इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन माइनिंग इंजिनिअरिंग अशा विविध क्षेत्रांमधून करिअर करू शकता.
- आयटीआय या क्षेत्रामध्ये विविध पर्याय असून ट्रेडदेखील आहेत. त्यामुळे टर्नर, मेकॅनिक, वेल्डर, प्लंबर, इलेक्ट्रीशियन असे विविध पर्याय आहेत.
------------------------------
१२ वी नंतर संधी
सायन्स पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकी आर्किटेक्चर, एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीडीएस, बीएससी, बीसीए, बीसीएस, फार्मसी, बीबीए, डिप्लोमा, बीआयडी, एलएलबी, बीएमएस, बी कॉम, सीएस, सी ए अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश घेऊन उत्तम करिअर करू शकता.
१२ वी कॉमर्स पूर्ण केल्यानंतर बीबीए, बीकॉम, बीए, बीएमएम,बीसीए, एलएलबी, बिजेएमसी, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, सीए, सीएस, सीआयएमए, सिपीए असे कोर्स करू शकतात. बारावी आर्टसनंतर बीए, बीबीए, बीएमएस, एलएलबी, बीसीए, फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया मॅनेजमेंट अशा विविध कोर्सला अॅडमिशन घेऊ शकता.
-------------------------
व्यावसायिक शिक्षणाचा पर्याय
एखाद्या विद्यार्थ्याला जर शिक्षणामध्ये रस नसेल तर लेडीज, जेन्ट्स पार्लरचा कोर्स करून उत्तम पर्याय आहे. याव्यतिरिक्त तुम्ही चांगले शिक्षण घेऊन एक यशस्वी उद्योजक बनवू शकता. त्यासाठी मनात कायम जिज्ञासा, चिकाटी असणे गरजेचे आहे. चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार आणि व्यवहारी वृत्ती ठेवली पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT