मुंबई

कचऱ्यातील टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर

CD

शर्मिला वाळुंज, डोंबिवली

कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण आता या कचरा कोंडीवर मात करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून अविघटनशील वस्तूंचा पुनर्वापर केला जाणार आहे. यासाठी १० ठिकाणी कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.
कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या काही वस्तूंचे विघटन, त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेकडून १० प्रभाग क्षेत्र हद्दीमध्ये कचरा संकलन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमांतर्गत हा उपक्रम कल्याण-डोंबिवली महापालिका पालिका हद्दीत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.
नागरिकांकडून घरात वापरून झालेली जुनी खेळणी, दप्तर, बूट, चप्पल, प्लास्टिकच्या वस्तू, वापरातील पण सुस्थितीत असलेली पुस्तके कचरा म्हणून फेकून दिली जातात. अशा वस्तू पालिकेच्या माध्यमातून विविध संकलन केंद्रांवर जमा कराव्यात, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे. या जमा होणाऱ्या वस्तू शहरातील विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, कचरा पुनर्प्रक्रिया करणाऱ्या संस्था यांच्या ताब्यात दिल्या जाणार आहेत. यामुळे चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात जाणार नाहीत. या कचऱ्याचा शहरात पुनर्वापर करण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. २० मे ते ५ जूनपर्यंत कचरा संकलन केंद्रांवर सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत कचरा संकलित केला जाणार आहे.
ही कचरा केंद्रे पाच स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालविली जाणार आहेत. प्रभागातील कर्मचारी, महिला बचत गट सदस्य, कचरा वेचक संघटना प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी असतील, असे आयुक्तांनी सांगितले. जमा टाकाऊ साहित्य पुनर्प्रक्रियेसाठी, वापरासाठी सामाजिक, स्वयंसेवी संस्थांना दिले जाणार आहे. कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी महिला बचत गटांना कापडी पिशव्या विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

कचरा संकलन केंद्रे
अ प्रभाग क्षेत्र, वडवली गाव, ब प्रभाग क्षेत्र, वाणी विद्यालयाजवळ, कल्याण, क प्रभाग क्षेत्र सुभाष मैदान, अत्रे मंदिराजवळ, कल्याण, जे प्रभाग, भगवती अभिलाषा कन्ह्वेंचर, रेल्वे तिकीट खिडकीजवळ, कल्याण पूर्व, ड प्रभाग क्षेत्र, कल्याण पूर्व, फ प्रभाग क्षेत्र, जुने डोंबिवली विभागीय कार्यालय, ह प्रभाग क्षेत्र, उमेशनगर, डोंबिवली पश्चिम, ग प्रभाग क्षेत्र, मारुती महादेव सोसायटी, सुनील नगर, आय प्रभाग क्षेत्र, गायत्री सोसायटी, पिसवली, कल्याण पूर्व. ई प्रभाग कार्यालय, रिजन्सी इस्टेट, डोंबिवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT