मुंबई

रेल्वे हद्दीतील गटराकडे दुर्लक्ष

CD

चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः चुनाभट्टी स्थानक परिसरातील रेल्वे रुळांलगत असलेल्‍या नाल्‍याची अद्याप सफाई करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाळ्यात येथील रुळ पाण्याखाली येण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्‍त केली जात आहे. तसेच प्रशासन या नाल्‍यांकडे दुर्लक्ष करत असल्‍याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून रुळांच्या जवळ असलेल्‍या नाल्‍यांची सफाई करण्यात येते. मात्र यंदा पावसाळा जवळ आला असताना देखील चुनाभट्टी रेल्वे स्थानक जवळील नाल्यांची सफाई झाली नसल्‍याने प्रवाशांनी संताप व्यक्‍त केला आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई केली नाही तर याचा फटका चुनाभट्टी रेल्वे स्थानक, बस डेपो, संजय गांधीनगर, समर्थनगर सोसायटी, आंबेकर नगर सोसायटीला बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बाबत रेल्‍वे अधिकाऱ्यांनी तातडीने नाल्‍यांची पाहणी करून येथील गाळ काढण्याची मागणी नागरिकांसह माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT