मुंबई

तृतीय आंतरराष्ट्रीय महापरिषदेचे आयोजन

CD

डोंबिवली, ता. २३ (बातमीदार) : हिंदू महासागराच्या सागरी सीमांचे संरक्षण आणि त्यात तमिळ ईलमचे आत्यंतिक महत्त्व या विषयावर स्वामी विवेकानंद संकुल येथे हिंदू युवा प्रेरणा (इंडिया) आणि स्मॉल ड्रॉपल्स (यू के) यांच्या संयुक्त विद्यमानाने तृतीय आंतरराष्ट्रीय महापरिषद घेण्यात आले होते. या कार्यक्रमात महेश पाटील यांनी सागरी आरमाराचे महत्त्व आणि त्या संबंधी छत्रपती शिवाजी महाराजांची असलेली दूरदृष्टी, परकीय आक्रमण; तसेच सम्राट राजचेला यांचे सागरी सामर्थ्यावर निर्माण केलेले अखंड हिंदुराष्ट्र यावर काही तथ्ये प्रस्तुत केली.
हिंदू युवा प्रेरणेचे अध्यक्ष हरिहरन यांनी हिंदू महासागराच्या परिसरात होत असलेली चीन, पाकिस्तान आणि अमेरिकेची घुसखोरी सागरी सीमांना आणि भारताला संभाव्य असलेले धोके, भारतातील बहुतेक राज्यांमध्ये झपाट्याने होत असलेली इस्लामीकरण, श्रीलंकेमध्ये चीन पुरस्कृत सिहलीमार्फत होणारे बौद्धीकरण, लव जिहाद आणि त्यांचे संभाव्य दुष्परिणाम अशा विविध विषयांवर आंतरराष्ट्रीय महापरिषदेत संबंधितांचे लक्ष वेधले. भारत सुपरपॉवर होण्यामध्ये असलेले अडथळे, त्याचे संभाव्य उपाय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या कामी असलेली दूरदृष्टी यावर भाष्य करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजप प्रदेश महासचिव दमन द्वीपचे महामंत्री विवेक दाढकर, भाजप युवा मोर्चाचे अमर उपाध्याय, तमिळ ईलमचे चाणक्य थिबाकरण त्यागराज, टॅन अभिवक्ता श्रीलंकन नागरिकत्व असलेले गणेशलिंगम चंद्रलिंगम, स्मॉल ड्रॉपल्सच्या अध्यक्षा बालनंदिनी बालसुब्रमण्यम (फ्रेश नागरिकत्व), हिंदू युवा प्रेरणेचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिहरन अय्यर; तसेच हिंदू युवा प्रेरणेचे राष्ट्रीय महासचिव महेश पाटील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT