मुंबई

शेकडो गावे पाण्याविना

CD

अलिबाग, ता. २४ (बातमीदार) ः एकीकडे कडक उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे धरणांतील पातळी खालावल्‍याने भेडसावणाऱ्या पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. अनेक आदिवासी वाड्या-पाड्यांतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्‌मैलाची पायपीट करावी लागत आहे. अलिबागसह नऊ तालुक्यातील गाव-वाड्यांमध्ये ३२१ ठिकाणी पाण्याचा तीव्र दुष्काळ निर्माण झाला असून पुढील आठवडाभरा परिस्‍थिती आणखी गंभीर होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्‍हाभरात जलजीवन मिशन योजना राबवण्यात आली. ग्रामपंचायत क्षेत्रात आराखडा तयार करून कोट्यवधींचा निधीही मंजूर करून आला. पाण्याचे नैसर्गिक स्रोत शोधून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठामार्फत गावे-वाड्यांमधील नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न केला. गावागावांत पाइप टाकण्यात आले, पण घरापर्यंत पाणीच पोहचत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. एकाच ठेकेदाराला अनेक कामे दिल्‍याने बहुतांश गावांतील योजनांची कामे अपूर्ण आहेत. ही योजना अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाण्याचे संकट जाणवू लागले. पेण तालुक्यात सर्वात आधी पाणीटंचाईला जाणवू लागली. तापमान वाढल्‍याने धरणांची पातळी खालावली आणि टंचाईग्रस्‍त गावांच्या संख्येत वाढ झाली. अलिबाग, पनवेल, महाड, कर्जत, पोलादपूर, खालापूर, पेण, सुधागड श्रीवर्धन या नऊ तालुक्यातील ६९ गावे, २५२ वाड्यांमध्ये पाण्याचा तीव्र दुष्काळ आहे. या गावे-वाड्यांमध्ये प्रशासनाद्वारे ४१ टँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

तालुके - गावे - वाड्या - टँकर
अलिबाग - ४ - ०० - २
पनवेल - ५ - ८ - ५
महाड - १० - ११३- ८
कर्जत-८- ५ - २
पोलादपूर-१४ - ३७ - ३
, खालापूर -७ - १३ - ४
पेण - २० - ६१ -१४
सुधागड - ०० - ८ - २
श्रीवर्धन - ३ - ७ - १
एकूण -६९ - २५२ - ४
----------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

IPL 2024 RCB vs CSK Live Score: चेन्नईला दुसरा धक्का! कर्णधारापाठोपाठ डॅरिल मिचेलही आऊट

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT