मुंबई

आंबेतपूल बंद असल्याने एसटी फेरीबोटीतून

CD

मुंबई, ता. २३ ः रायगड येथील आंबेत पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात जाणाऱ्या एसटीच्या मुंबई, बोरिवली, ठाणे मार्गावरील फेऱ्यांवर परिणाम होणार होता; मात्र त्याला पर्याय म्हणून आंबेत म्हाप्रळ फेरी बोटीतून आता एसटी बसला वाहून नेण्याला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दापोली, मंडणगड आगारातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
एसटी प्रवाशांच्या मागणीप्रमाणे दापोली, मंडणगड आगारातून धावणाऱ्या बसच्या प्रवासी सेवेमध्ये कोणताही खंड न पाडता, त्यांची सेवा आता फेरी बोटीतून केला जाणार आहे. यामध्ये सध्या स्थितीत दापोलीहून मुंबई, शिर्डी, नाशिक, बोरिवली, विठ्ठलवाडी, नालासोपारा धावणाऱ्या काही बस आहेत, तर मंडणगड येथून शिर्डी, बोरिवली, पनवेल, बीड, नालासोपारा धावणाऱ्या २६ फेऱ्या आहेत. फेरी बोटीमुळे त्या आता नियमित सुरू राहणार असल्याचे एसटीच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले आहे.
...
मेरीटाईम बोर्डाने दिल्या सूचना
- फेरी बोटीत बसला प्रवेश देण्यापुर्वी बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून घ्यावे, बसमध्ये फक्त प्रवाशांचे सामान ठेवावे.
- बसमधून फेरी बोटीमध्ये उतरलेल्या प्रवाशांना लाईफ जॅकेट घालण्याची सर्व जबाबदारी बसवरील चालक, वाहक तसेच बोट मास्टरची राहील.
- फेरी बोटीमध्ये बस चढउतार करतेवेळी प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चालक, वाहक व परिवहन विभागाची राहील.
- फेरी बोटीतील गर्दी नियंत्रण आणि व्यवस्थापनाची जबाबदारी फेरी बोट चालक व आॅपरेटरची राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

IPL 2024 LSG vs RR Live Score : एक विजय अन् संजूच्या संघाची प्लेऑफमध्ये होणार एन्ट्री की KL राहुल घेणार बदला?

Shruti Haasan: चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप? 'या' कारणामुळे होतीये चर्चा

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

US Food Regulator: अमेरिकेतही एव्हरेस्ट आणि एमडीएचवर येणार बंदी? एफडीए झाली सतर्क

SCROLL FOR NEXT