मुंबई

गावठाणांकडे कानाडोळा

CD

तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या स्वच्छता सर्वेक्षणाअतंर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. संपूर्ण शहराच्या स्वच्छतेवर भर दिला जात असून रंगरंगोटीतून प्रबोधन केले जात आहे. मात्र एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे गावठाणांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने गटारांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे पाणी तुंबण्याचा धोका वाढला आहे.
वाशीसारख्या शहरी भागाला लागून असलेल्या कोपरी गावात अजूनही उघड्या गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या कचऱ्यावर उंदीर-घुशींचा वावर असल्याने स्थानिक हैराण आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत, पण अधिकाऱ्यांकडून याकडे कानाडोळा केला जात असल्याने उघड्या गटारांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे एकीकडे शहरी भागात कचरा वर्गीकरण होत असताना, दुसरीकडे गावठाण भागात मात्र कचऱ्याचे ढीग लागल्याचे चित्र आहे.
-----------------------------------------------
कचरा वर्गीकरण फक्त कागदावर
- गावठाणात कचरा वर्गीकरण होत नसल्याचे चित्र आहे. कचरा टाकण्यासाठी नागरिकांना मोठ्या कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत, मात्र वर्गीकरणासाठी हिरवी, निळी कचराकुंडी कोठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे सर्व कचरा गटारांमध्येच टाकला जात आहे.
- कचऱ्याची ही स्थिती असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी गटारे अजूनही उघड्या अवस्थेत आहेत. तसेच कित्येक महिन्यांपासून त्यांची स्वच्छता झाली नसल्याने प्लास्टिकच्या कचऱ्याने तुडुंब भरली आहेत. यामुळेच स्वच्छता सर्वेक्षणाची ही मोहीम गावठाणांपर्यंत पोहचली नसल्याचे दिसत आहे.
------------------------------------------
ज्या भागात उघडी गटारे आहेत, त्यांची दैनंदिन साफसफाई केली जाते. तसेच काही ठिकाणी सफाई होत नसेल तर त्याबाबत संबंधितांना सांगून लवकरच स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल.
- बाबासाहेब रांजळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT