मुंबई

दगडखाणींमुळे भातशेतीचे नुकसान झाल्याची तक्रार

CD

वाडा (बातमीदार) : तालुक्यातील गुंज गावाच्या परिसरात अनेक दगडखाणी आहेत. त्यामधून निघणारी माती दगडधोंडे हे शेतकऱ्यांच्या भातशेतीत जाऊन शेतीचे नुकसान होत आहे. या प्रकरणी प्रशासनाने दखल घेऊन नुकसानभरपाई देण्याची मागणी रंजना हरड या महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तालुक्यातील गुंज गावातील दगडखाणीलगतच रंजना हरड यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीत दगडखाणीमधील माती, दगडधोंडे जात आहे. त्यामुळे संपूर्ण शेती नापीक झाली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. भातशेती नापिक झाल्याने त्याची प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. वाड्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता, या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT