मुंबई

शर्यतीचा धुरळा उडाला; पण बक्षिसाच्या गदाच गायब

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २५ : कल्याण पूर्वेमध्ये खरड गावात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे आमदार केसरी बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडाला, पण तो थोडा उशिरानेच. शर्यत उशीर सुरू झाल्याने स्पर्धेच्या ठिकाणी अंधार पडला आणि या अंधाराचा फायदा घेत थेट मंचावरून चोरट्यांनी आपला हात साफ करत तब्बल दहा ते बारा गदा चोरून नेल्या. पोलिस बंदोबस्त, आयोजकांच्या उपस्थितीत ही चोरी घडल्याने आयोजकांनी मंचावरून गदा चोर... ज्यांनी कोणी गदा चोरली असेल त्यांनी परत आणून द्या, असे आवाहन करण्यास सुरुवात केली. याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतींचा धुरळा रोज कोठे ना कोठे उडत आहे. मलंगगड परिसरात खरड गावात कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नावे आमदार केसरी स्पर्धेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. काकडवाल गावातील नीलेश कान्हा पावशे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा सुरू होण्यास काहीसा उशीर झाल्याने रात्री उशिरापर्यंत स्पर्धा सुरू होती. रात्रीचा अंधार पडल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून थेट मंचावरून बक्षिसांच्या रूपात ठेवलेल्या दहा ते बारा गदाच या चोरट्यांनी चोरून नेल्या. स्पर्धेच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त, आयोजक, कार्यकर्ते यांची उपस्थिती असतानाही हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

--------------
चोरीची तक्रार दाखल नाही
बक्षीस वितरणाच्या दरम्यान गदा चोरीला गेल्याची माहिती समोर आली. यानंतर आयोजकांनी गदा चोर म्हणत, ज्यांनी कोणी गदा चोरली ती परत आणून द्या, असे आवाहन करण्यास सुरुवात केली. मात्र चोरट्यांनी चोरलेल्या गदा परत केल्याच नाहीत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
बैलगाडा शर्यतीच्या मंचावरून दहा ते बारा गदा चोरीला गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप हिललाईन पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT