मुंबई

रमाबाई नगरात एकाच रात्रीत नऊ घरफोड्या

CD

घाटकोपर, ता. २७ (बातमीदार) ः घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात आज (ता. २७) पहाटेच्या सुमारास तब्बल नऊ घरफोड्या झाल्या आहेत. त्यात सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. या घटनेनंतर पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फोडलेल्या घरांचा पंचनामा केला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिस प्रयत्न करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवीदत्त सावंत यांनी दिली.
रमाबाई आंबेडकर नगरातील सम्राट अशोक चाळ आणि नवरत्न चाळ येथील नऊ घरांची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, तसेच रोकडसह इतरही मौल्यवान समान चोरले आहे. ही घटना आज (२७ मे) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी लालबिहारी गुप्ता यांच्या घरातील कपाटातून एक सोन्याची चेन, दोन अंगठ्या असा ऐवज लांबवला; तर शिवशरण, हिराबाई शार्दुल, दौंडकर यांच्यासह इतर रहिवाशांचा ऐवज आणि रोकड लांबवली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. इतर घरफोडीतही दरवाजाचे कुलूप-कोयंडे कापले आहेत. सर्व घरांची एकाच पद्धतीने कुलपे कापल्याने ही चोरी एकाच टोळीने केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत ही घटना उघडकीस आल्यानंतर पंतनगर पोलिसांनी येथे येऊन ज्या घरांत घरफोडी झाली आहे, त्यांचे पंचनामे केले आहेत; मात्र काही घरांतील रहिवासी गावी गेल्याने अद्याप कोणाच्या घरातील किती ऐवज आणि रोकड गेली याचा अंदाज आलेला नाही.

गावी जाणाऱ्यांच्या घरी घरफोडी
उन्हाळी सुट्टीत मुंबईकर गावी जातात. याचा गैरफायदा घेत अशा घटना घडतात. रमाबाई आंबेडकर नगरातील या नऊ घरांच्या घटनाही अशाच घडल्या आहेत. यातील अनेक जण गावी गेले आहेत; तर येथील एका घटनेत घरात लोक झोपले असतानाही त्या घराचा कुलूप-कोयंडा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला; मात्र घरात कुत्रे असल्याने आणि ते भुंकत असल्याने तो अयशस्वी झाला, अशी माहिती स्थानिक रहिवासी डी. जे. गांगुर्डे यांनी दिली.

रमाबाई आंबेडकर नगरात पहाटे घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अधिक तपास सुरू असून गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू आहे. अरोपींना अद्याप अटक झालेली नसून, यासाठी पोलिस पथके तयार केली जातील.
- रवीदत्त सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंतनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT