मुंबई

कचऱ्याविरोधात महिलांचा एल्गार

CD

नवीन पनवेल, ता.२८ (वार्ताहर)ः नवीन पनवेल येथील कचरा संकलन केंद्रात प्रभाग समिती ‘ड’ तसेच परिसरातील कचरा संकलन करून सेक्टर १ एस येथील ठिकाणी एकत्र करून संकलित केला जातो. तेथून हा कचरा वाहतूक करून थेट घोटचाळ येथील सिडकोच्या कचरा संकलन केंद्रात पाठवला जातो. पण या कचऱ्यामुळे दुर्गंधी निर्माण होत असल्याने नवीन पनवेलमधील महिलांनी हे संकलन केंद्र बंद करण्याच्या मागणीसाठी थेट एल्गारच पुकारला आहे.
छोट्या गाड्याने संकलित केलेला कचरा थेट घोट येथील डंपिंग ग्राऊंडवर नेला जाऊ शकत नसल्याने तो नवीन पनवेल येथील डेपोमध्ये जमा करावा लागत आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण तयार झाले आहे. प्रत्येकांना आरोग्यविषयी तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. येथील नागरिकांना घराचे दरवाजे, खिडक्या बंद करून घ्यावे लागत आहेत. तसेच येथील वातावरण प्रदूषण युक्त झाले असून येथील नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. विशेष म्हणजे, या परिसरात देवस्थाने, मंदिरे, हॉटेल्स, लग्नाचे हॉल तसेच हॉस्पिटल असल्यामुळे पालिकेने कचरा संकलन केंद्र बंद करावे, यासाठी महिलांनी रविवारी (ता.२८) सकाळी गेटवर आंदोलन केले होते. सकाळी दहा वाजल्यापासून सुरू असलेले आंदोलन दुपारी चार वाजेपर्यंत सुरूच राहिल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
-----------------------------------
कचरा संकलनातील मुख्य अडचणी
- शहरातील घनकचरा संकलन व प्रभावीपणे होण्यासाठी छोट्या गाड्यांमधून संकलित केलेला कचरा घोट चाळ येथील सिडको मालकीच्या प्रक्रीया केंद्रावर पाठविणे शक्य नसल्याने प्रभाग समिती ‘ड’ लगतच्या परिसरातील कचरा नवीन पनवेलच्या सेक्टर १ एस येथे एकत्र केला जातो.
- मोठ्या वाहनांमार्फत हा कचरा संकलित करून सिडकोचे प्रक्रीया केंद्रावर वाहतूक करण्यात येतो. मात्र, त्यासाठी सकाळी ८:०० ते सायंकाळी ६:०० पर्यंतची वेळ असल्याने हा कचरा दुसऱ्या दिवशी सकाळी पोट चाळ येथील प्रक्रीया केंद्रावर पाठविला जातो.
--------------------------------------------------
या ठिकाणी कचरा संकलनामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाकडून पनवेल महापालिकेला कचरा संकलनासाठी जोपर्यंत जागा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत या समस्येतून सुटका होणे कठीण आहे.
-प्रीतम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते
-----------------------------------------
वर्षभरापासून आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे या ठिकाणी राहणे आता कठीण झाले आहे. तरी प्रशासनाने येथे कचरा जमा करणे बंद करावे.
-सुचेता कामेरकर, आंदोलक महिला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT