मुंबई

नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळेना!

CD

खारघर, ता.२९ (बातमीदार): बेलापूरपासून पेंधर दरम्यानच्या अकरा किलोमीटरच्या पहिल्या मार्गावरील मेट्रोच्या सर्व चाचण्या पार पडलेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळेल, असे संकेत सिडकोकडून दिले होते. मात्र, मे महिना संपण्याच्या मार्गावर असताना नवी मुंबई मेट्रो सुरु करण्याबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल नसल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे
नवी मुंबई क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने सिडकोने बेलापूर रेल्वे स्थानक ते पेंधर या अकरा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम मे २०११ रोजी सुरू करण्यात आले होते. बारा वर्षांपासून धीम्या गतीने सुरु असलेल्या या प्रकल्पाला चालना देण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने पेंधर ते बेलापूर मार्गावरील सर्व स्थानकाचे काम एप्रिल अखेर पर्यंत पूर्ण करण्यात आले आहेत. याबाबत सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.
--------------------------------------------
नव्या मुहूर्ताची चर्चा
सर्व स्थानकाचे काम पूर्ण झाले असून दिल्ली मेट्रो रेल्वे विभागाचे आयुक्त आर.के. शर्मा यांच्या उपस्थितीत बेलापूर ते पेंधर मार्गावर चाचणी देखील घेण्यात आली होती. त्यामुळे सर्व चाचण्या पार पडल्याने लवकरच नवी मुंबई मेट्रो सुरु होईल, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू झाली होती. मात्र, मे महिना संपला तरी नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला नसल्याने आता पावसाळ्यात मेट्रो धावणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.
---------------------------------------
किरकोळ कामे शिल्लक
बेलापूर, आरबीआय कॉलनी, बेलपाडा, वास्तुविहार, केंद्रीय विहार या स्थानकांतील रेल्वे ट्रक, प्रवेश मार्ग, कंट्रोल रूम तसेच सर्व यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच मेट्रो मार्गामुळे दिवसा वाहन रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये म्हणून किरकोळ शिल्लक कामे रात्रीच्या वेळी पूर्ण करण्याचा सल्ला सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सिडको अधिकाऱ्यांनी परवानगीसाठी लागणाऱ्या सर्व दस्तावैजाची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT