मुंबई

गोरेगावमध्ये तरुणाची चाकूने भोसकून हत्या

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : गोरेगाव पूर्व येथे २७ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी (ता. २७) रात्री घडली. याप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीला रविवारी (ता. २८) अटक केली. आदित्य नलावडे असे अटक आरोपीचे नाव आहे.
राजू साहेबू सुरंजे असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या छातीत, गळ्यात व पोटात चाकूने वार करण्यात आले आहेत. त्याला जखमी अवस्थेत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येत वापरण्यात आलेला चाकू अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सुरुवातीला वनराई पोलिसांकडून हत्येचा प्रयत्न कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचे कलम वाढवले. मृत राजू हा गोरेगाव पूर्व येथील कामा इस्टेट परिसरातील रहिवासी होता. तो गॅरेजमध्ये काम करत होता. राजूचा त्याच परिसरात राहणाऱ्या निवासी राणी मिश्रा व तिची आई यांच्याशी वाद झाला होता. त्यातून शनिवारी वाद सुरू असताना आरोपी आदित्य नलावडे याने चाकूने राजूच्या गळ्यावर, छातीवर व पोटात वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

Poha Chila Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

SCROLL FOR NEXT