मुंबई

मुंबई मेट्रोचे प्रवाशांना विमा सुरक्षा कवच

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेट्रो मार्ग-२ -अ आणि ७ ने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता प्रवासी विमाकवच लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा पॉलिसी महामुंबई मेट्रोमार्फत देण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान संभाव्य जोखमीचे तपशीलवार विश्लेषण करून आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन प्रवाशांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. अशा प्रकारच्या योजना या प्रवासादरम्यान अपघात, अपंगत्व, मृत्यू यांसारख्या घटना घडल्यास प्रवाशांना आर्थिक मदत करतात.
...
सुरक्षा कवच असे...
- प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यास एक लाख रुपये
- बाह्यरुग्णांसाठी १० हजारांपर्यंतची भरपाई
- रुग्णालयातील संरक्षणाव्यतिरिक्त बाह्यरुग्ण उपचार खर्च कमाल १० हजारांपर्यंत
- किरकोळ दुखापतीच्या भरपाईसह वैद्यकीय खर्चाअंतर्गत जास्तीत जास्त ९० हजार इतकी भरपाई
- अपघातादरम्यान मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये नुकसानभरपाई
- कायमचे किंवा आंशिक अपंगत्व आल्यास ४ लाखांपर्यंत नुकसाईभरपाई
...
संरक्षण कधी मिळणार?
ही पॉलिसी ज्या प्रवाशांकडे वैध तिकीट/ पास/ स्मार्ट कार्ड/ क्यूआर कोड/ वैध परवानगी असेल अशा सर्व वैध प्रवाशांसाठी लागू असेल. तसेच सदर पॉलिसी ही वैध प्रवासी हा मुंबई मेट्रो स्थानकाची इमारत, प्लॅटफॉर्म किंवा ट्रेनमध्ये किंवा स्थानक परिसरात जसे की सशुल्क आणि विनाशुल्क परिसर अशा सर्व ठिकाणी वैध असेल, पण मेट्रो स्टेशन इमारतीचे बाह्य क्षेत्र जसे की पार्किंग इत्यादी ठिकाणी काही अनिश्चित घटना/ अपघात घडल्यास या विमा पॉलिसीचे संरक्षण त्या व्यक्तीला लागू होणार नाही.
...
अनेक आंतरराष्ट्रीय मानांकनांवर आधारित उभारलेल्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा सुरक्षित आहेच; पण सर्व सुरक्षा उपायांव्यतिरिक्त आम्हाला अनपेक्षित उद्भवणाऱ्या परिस्थितीत प्रवाशांचे जीवन सुरक्षित करणेही अत्यंत गरजेचे होते म्हणून आम्ही सर्व मेट्रो प्रवाशांना सर्वसमावेशक विमा संरक्षण प्रदान करत आहोत.
- एस. व्ही. आर. श्रीनिवास, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महामुंबई मेट्रो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT