मुंबई

यंदाही खड्डेमुक्त प्रवास हुकणार

CD

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ३१ : यंदाच्या वर्षी पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवास करता यावा, यासाठी ठाणे पालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांसाठी शासनाकडून दोन टप्प्यांत ६०५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या कामांसाठी ३१ मे ची मुदत देण्यात आली होती. असे असताना, रस्त्यावरील मास्टिकची व डांबरीकरणाची केवळ ८० टक्केच कामे झाली असून युटीडब्ल्यूटी आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या रस्त्यांच्या अर्धवट झालेल्या कामांमुळे यंदाही पावसाळ्यात वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात रस्त्यांवर पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना रस्त्यावरून वाट काढणे कठीण होत असते. यामुळे वाहतूक कोंडीला आमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात पडणाऱ्या खड्डे आणि वाहतूक कोंडीवरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात येत असते. ही बाब लक्षात घेता, यंदाच्या वर्षी पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त व वाहतूक कोंडीमुक्त प्रवास व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. ठाणेकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ३१ मे पर्यंत या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. तसेच तशा सूचनादेखील संबंधितांना देण्यात आल्या होत्या. असे असले तरी दुसरीकडे रस्त्यांच्या कामांसाठी दिलेली मुदत संपली आहे. आतापर्यंत शहरात रस्त्यावरील मास्टिकची व डांबरीकरणाची केवळ ८० टक्केच कामे झाली असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ७ जूनपर्यंतचा कालावधी जाणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. युटीडब्ल्यूटी आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील घोडबंदर, पातलीपाडा, ब्रम्हांड, घोडबंदरच्या आतील बाजूस आणि शहराच्या इतर भागातही सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी खोदकाम सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे युटीडब्ल्यूटी आणि सिमेंट काँक्रिटीकरण ही कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत पालिका प्रशासनाने अळीमिळी गुपचिळी अशी काहीशी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या अर्धवट झालेल्या कामांमुळे यंदाही पावसाळ्यात वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
-----------------------
अशी आहेत कामे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना यंदाच्या पावसाळ्यात खड्डेविरहित रस्त्यांवरून प्रवास करता यावा, यासाठी शासनाच्या माध्यमातून ६०५ कोटींचा निधी दोन टप्प्यांत ठाणे पालिकेला दिला आहे. या निधीतून २८३ रस्त्यांच्या नूतनीकरण आणि दुरुस्तीचे काम करण्यात येत आहेत. यामध्ये १०.४६ किमी लांबीचे काँक्रीट रस्ते, ५९.३१ किमी लांबीचे युटीडब्ल्युटी, ४६.७७ किमी लांबीचे डांबरी रस्ते, १९.१२ किमीचे मास्टीक पद्धतीने रस्ते तयार करण्यात येत आहे.

....
शहरात रस्त्यांवर मास्टिक करणे, डांबरीकरण करणे, युटीडब्ल्यूटी आणि सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. ही कामे पूर्ण व्हावीत यासाठी सर्वच कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी वर्ग प्रयत्न करीत आहेत. त्यात १ मार्च रोजी कामांच्या वर्कऑर्डर देण्यात आल्या आहेत. तीन महिन्यांत रस्त्यांची कामे वेगाने झाली आहेत. त्यामुळे उर्वरित कामेदेखील लवकरच पूर्ण होतील.
- रामदास शिंदे, उपनगर अभियंता, ठाणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT