मुंबई

एसटीची आज ‘अमृतमहोत्सवी’ साजरी होणार

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) पहिली फेरी १ जून १९४८ रोजी नगर-पुणे मार्गावर धावली. या घटनेला यंदा ७५ वर्षें पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने एसटीचा ‘अमृत महोत्सवी’ वर्धापनदिन सोहळा उद्या (ता. ३) मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, एसटीचे सदिच्छा राजदूत अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित राहणार असल्याची माहिती एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. या वेळी एसटीच्या ७५ वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या ‘विश्वरथ’ या वातानुकूलित फिरत्या बसचे उद्‍घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने
एसटीच्या ‘कॉफी टेबल’ पुस्तकाचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. २५ वर्षांपेक्षा जास्त सुरक्षित सेवा बजावणाऱ्या पाच चालकांचा सपत्निक सत्कार होणार आहे. गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील पहिल्या तीन विभागांचा व २५० आगारांपैकी गटनिहाय ९ आगारांचा सत्कार होणार आहे. दूरदर्शी प्रणालीद्वारे राज्यातील विविध बसस्थानकांचे भूमिपूजन, उद्‍घाटन आणि बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण आदी कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT