मुंबई

रविवारी पवई तलाव स्वच्छता मोहीम

CD

मुंबई, ता. २ ः आयआयटी मुंबईच्या अभ्युदय सामाजिक संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (ता. ४) पवई तलावाच्या स्वच्छतेचा उपक्रम आयोजित केला आहे.
अभ्युदय ही देशातील सर्वात मोठी विद्यार्थी-संचालित सामाजिक संस्था आहे. समाजात योगदान देण्याच्या आणि सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने अभ्युदयने आजवर अनेक मोहिमा, कार्यक्रम आणि स्पर्धा केल्या आहेत. पवई तलाव स्वच्छता अभ्युदयच्या सर्वांत मोठ्या मोहिमांपैकी एक आहे. युनिसेफ इंडियाच्या सहकार्याने आयोजित केली जात आहे. या कार्यक्रमाला खासदार मनोज कोटक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्वच्छ, हिरवेगार आणि आरोग्यदायी वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पवई तलावाच्या काठाची स्वच्छता करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. लोकांमध्ये जागरूकता पसरवणे आणि पवई तलावातील कचरा थांबवणे हादेखील यामागचा उद्देश आहे. मागील वर्षाच्या आकडेवारीचा विचार करता, मोहिमेमध्ये २.५ टन कचरा गोळा करणारे ४०० हून अधिक स्वयंसेवक असतील. जमा झालेल्या कचरा रिसायकल केला जाईल. ४ जून रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत पवई तलाव येथे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच बाहेरील लोकांसाठी ही मोहीम खुली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT