मुंबई

दिव्यांग, वृद्ध करणार घरातूनच मतदान

CD

संजय मिस्कीन : सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २ : देशभरात ईव्हीएमविरोधात सर्वच विरोधी पक्ष साशंक असताना आता दिव्यांग आणि ८० वर्षांवरील वृद्धांना घरात बसूनच ‘बॅलेट’द्वारे मतदान करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे धोरण आगामी लोकसभा आणि इतर सर्वच निवडणुकांत लागू करण्याचा निर्णय घेत सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत. हे धोरण आगामी सर्व निवडणुकांत अमलात आणले जाईल, अशी स्पष्ट माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. २०२४ ला होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच या निर्णयामुळे या वेळची लोकसभा निवडणूकदेखील ऐतिहासिक होणार असल्याचे संकेत आहेत. आतापर्यंत दिव्यांग आणि वृद्धांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट मतदान केंद्रापर्यंत जावे लागत असे. त्यामुळे अनेक दिव्यांग आणि वृद्ध मतदानापासून वंचित राहत असत. मात्र या निर्णयाने या वर्गातील मतांचा टक्का वाढणार असून सत्ताधारी पक्षासाठी हा टक्का महत्त्वाचा ठरेल, असे मानले जाते.
...
कोल्हापूरमध्ये उत्तम प्रतिसाद
यापूर्वी दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर विविध सुविधा पुरवण्यात यंत्रणेचे श्रम आणि पैसा खर्च करण्यापेक्षा त्यांनाही पोस्टल मतदानाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, असा प्रस्ताव सनदी अधिकारी सूरज मांढरे यांनी २०१९ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केला होता. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांतही या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने यापुढील सर्वच निवडणुका आणि सार्वत्रिक लोकसभेत सरसकट हा प्रयोग राबवण्यात येणार आहे.
...
दिव्यांग आणि ८० वर्षांच्या वरील वृद्धांनी विशिष्ट नमुना अर्जानुसार घरातूनच मतपत्रिका (बॅलेट)नुसार मतदान करण्याची मागणी केली तर त्यांना तशी सुविधा देण्यात येईल. यापुढे सर्वच निवडणुकांत हा निर्णय लागू असेल.
- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी
...
लाभार्थी मतदार
- ८० वर्षांवरील - २९,४०,५९४
- दिव्यांग - ६,४१,९२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT