मुंबई

सेतू सहकाराचा सदर

CD

सेतू सहकाराचा सदर
शरद्चंद्र देसाई
वकील, सहकार न्यायालय

गृहनिर्माण संस्थेची सभा
दरमहा होणे आवश्यक

प्रश्न ः सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी समितीच्या सभा दरमहा घेणे आवश्यक आहे का? म्हणजेच एका वर्षात एकूण बारा सभा घेणे बंधनकारक आहे का?
- विजयेंद्र कुलपे, वरळी, मुंबई
उत्तर ः कोणत्याही गृहनिर्माण संस्थेमध्ये मग त्यांची सभासद संख्या कितीही असो, काही कामे ही नियमितपणे होणे आवश्यकच आहे. उदा. दरमहाच्या संस्थेच्या खर्चाला मंजुरी इ. या अशा आवश्यक कामासाठी दर महिन्याला कार्यकारी मंडळाची मासिक सभा होणेदेखील आवश्यक आहे. आदर्श उपविधी क्रमांक १२७ नुसार कार्यकारी मंडळाची सभा आवश्यक असेल त्याप्रमाणे घेण्याचे अधिकार कार्यकारी मंडळास आहेत; परंतु महिन्यामध्ये ती किमान एकदा घेतलीच पाहिजे, असा मानक आहे. याचा अर्थ ती महिनाभरात अनेकदाही घेता येते. आदर्श उपविधी क्रमांक १२७ (ब) अन्वये आणीबाणीच्या प्रसंगी समिती त्यांना आवश्यक असे ठराव त्यांच्या समिती सदस्यांकडून मंजूर करून घेऊ शकतात; पण असे ठराव होणाऱ्या प्रथम कार्यकारिणी समितीच्या सभेत ठेवून संमत करणे आवश्यक आहे. याच उपविधीप्रमाणे आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यात येत आहे. संस्थेमध्ये समितीची मासिक सभा किमान एक होणे आवश्यक आहे. त्याच नियमानुसार वर्षात एकूण किमान १२ सभा होणे बंधनकारक आहे. या सर्व बाबी संस्थेचे लेखापाल तसेच शासकीय लेखापाल आपल्या अहवालात नमूद करतात. मासिक सभांना उपस्थित असलेल्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची नोंदही वार्षिक अहवालामध्ये करण्यात येते. जेणेकरून संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सर्व सभासदांना त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी संस्थेच्या कामकाजामध्ये घेतलेल्या सहभागासंबंधी माहिती मिळते. सामान्यतः महिन्याभरात केलेल्या खर्चाला मंजुरी देण्यासाठी अशी मासिक समिती सभा महिनाअखेरीस घेतली जाते.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेलवर पाठवावेत ः sharadchandra.desai@yahoo.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT