मुंबई

भर उन्हात तळोजाकरांची लाहिलाही

CD

खारघर, ता. ५ (बातमीदार) : तळोजा वसाहतीमधून नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेतून महिन्याला एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. असे असताना परिवहन मात्र प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्याबाबत उदासीन असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. याचाच प्रत्यय तळोज्यात येत असून बस थांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे भरउन्हात उभे राहण्याची वेळ आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
तळोजा वसाहतीमधील प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेला जवळपास एक कोटीचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे नवी मुंबई परिवहन विभागानेदेखील या मार्गावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून नवीन बस सुरू करण्यावर भर दिला आहे. सध्या पालिकेच्या एनएमएमटी विभागाकडून तळोजा वसाहतीत घणसोली ते पेठाली गाव ५५ क्रमांकाची; तर बेलापूर रेल्वे स्थानक ते तळोजा ५२ क्रमांकाची बस तळोजा फेज एकमध्ये; तर तळोजा फेज दोनमध्ये एनएमएमटीच्या बस क्रमांक ४३, ४५, ५४ आदी बस धावतात. त्यामुळे प्रवाशांच्या माध्यमातून एनएमएमटीला चांगले उत्पन्न मिळत आहे; पण त्याबदल्यात तळोज्यातील प्रवाशांना सुविधा देण्यात परिवहन प्रशासन उदासीन असल्याने निवारा शेडअभावी उन्हातच उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
----------------------------------------------------
- गेल्या पाच वर्षांत तळोजा फेज दोनमध्ये सिडको तसेच अनेक खासगी विकसकांनी गृह प्रकल्प सुरू केले आहेत. अशातच नवी मुंबई मेट्रो सुरू होणार असल्यामुळे अनेक नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
- तळोजा फेज दोनमधील बस थांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना ऊन असो की पावसाळा ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे या बस थांब्यावर निवारा शेड उभारण्यासाठी परवानगी द्यावी, असे पत्र आदर्श सामाजिक संस्थेकडून पनवेल पालिकेला पाठवण्यात आले आहे.
----------------------------------------------------
तळोजा वसाहत पनवेल पालिकेच्या हद्दीत आहे. त्यामुळे निवारा शेडची व्यवस्था करण्याचे काम त्यांचे आहे; नवी मुंबई परिवहन सेवेचे नाही.
- योगेश कडुस्कर, व्यवस्थापक, नवी मुंबई परिवहन सेवा (एनएमएमटी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT