मुंबई

संपूर्ण महामुंबईत क्लस्टर आणणार!

CD

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ५ : आशिया खंडातील सर्वात मोठ्या ‘समूह पुनर्विकास’ प्रकल्पाला (क्लस्टर) ठाण्यातून सुरुवात होत आहे. ठाण्यानंतर मिरा- भाईंदरमध्ये भूमिपूजन होईल. त्यानंतर टप्प्याटप्पाने संपूर्ण महामुंबई परीक्षेत्रामध्ये त्याची अंमलबजावणी करून धोकादायक इमारतींमधील नागरिकांना दिलासा दिला जाईल; पण हे करताना मुंबई, ठाण्यातील ज्या इमारतींचा पुनर्विकास अर्धवट राहिला आहे, ते प्रकल्प सरकार ताब्यात घेऊन सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रितच्या माध्यमातून मार्गी लावेल. जेणेकरून मुंबईबाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणि ठाण्याबाहेर गेलेला ठाणेकर ठाण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ योजनेच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन सोमवारी (ता. ५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात झाले. मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या आणि सर्वाधिक धोकादायक इमारती असलेल्या किसननगर येथून या प्रकल्पाची सुरुवात १९९७ मध्ये साईराज इमारत दुर्घटनेत घर गमावलेल्या दाम्पत्याच्या हातून श्रीफळ वाढवून झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी क्लस्टरच्या संघर्षाचा प्रवास उलगडला. या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कुमार केतकर, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, पालिका आयुक्त अभिजीत बांगर, डॉ. संजय मुखर्जी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्लस्टरच्या लोगोचेही या वेळी अनावरण करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात १० हजार घरे
क्लस्टरच्या पहिला टप्प्यात १० हजार घरे देण्याचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच आज क्लस्टरच्या प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन झाले आहे, हे काम पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही, असेही ते या वेळी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT