मुंबई

निकृष्ट दर्जाचे बियाणे, खत द्याल तर खबरदार

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांची बियाणे लागवडीची लगबग सुरू झाली आहे. खरीप हंगामात ज्यादा दराने काही विक्रेते हे निकृष्ट दर्जाच्या खतबियाण्यांची विक्री करतात. या दुकानांवर कृषी विभागाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार खत आणि बियाणेविक्रेत्यांना ई पॉस मशीन वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. विक्रेते याचा वापर करतात का नाही, हे पाहण्यासाठी तालुका कृषी अधिकारी विठ्ठल कांबळे यांचे पथक दुकानात जाऊन तपासणी करत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे कृषी विभागाने दिली.
पावसाळा जवळ आल्यानंतर बियाणे व खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्‍यांची लगबग सुरू होते. अंबरनाथ तालुक्यात खरीप हंगामात चार हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी केली जाईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. भात पीक, नाचणी आणि फळभाज्या आदी पिकांची लागवड शेतकरी या दिवसांत करतात. शेतकऱ्‍यांची मागणी लक्षात घेता दुकानदार निकृष्ट दर्जाची खते, बियाण्यांची विक्री करून काळाबाजार करून करतात. तसेच शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे घेतले जातात. तालुक्यात असे प्रकार अनेकदा घडले असून कृषी विभागाने अशा विक्रेत्यांवर याआधी कारवाई केली आहे. खरीप हंगामात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी अंबरनाथ कृषी विभागाने कंबर कसली असून अंबरनाथ तालुक्यातील किसान कृषी सेवा केंद्र वांगणी याची तालुका कृषी अधिकारी विठ्ठल बांबळे यांनी तपासणी केली आहे. यावेळी कृषी केंद्र साठा रजिस्टर बाबींची पडताळणी करण्यात आली. तसेच दुकानांमध्ये ई पॉस मशीन ठेवणे, बियाण्यांचे दरफलक लावणे, स्टॉक लिस्ट ठेवणे, पक्की बिले देणे अशा विविध सूचना या वेळी दुकानदारांना देण्यात आल्या. या वेळी मंडळ कृषी अधिकारी अविनाश वडते, दीपक इंगोले, स्वप्नील जाधव, रूपाली राठोड, नैना पाटील हे कृषी विभागाचे सर्व अधिकारीदेखील उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT