मुंबई

ग्राहक सेवेच्या गुणवत्तेत सातत्य राखा - लोकेश चंद्र

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः गेली अनेक वर्षे महावितरणमधील अधिकारी व कर्मचारी सातत्याने कठोर परिश्रम करत आहेत. ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व शाश्वत वीजपुरवठा देत वीजहानी कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले. महावितरणच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

याप्रसंगी पुढे बोलताना लोकेश चंद्र म्हणाले, की आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून स्मार्ट मीटर, स्काडा असे प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबवायचे आहेत. यापुढेही आपण ग्राहक सेवेच्या गुणवत्तेत सातत्य राखाल. येणाऱ्या काळात महावितरणची आणि पर्यायाने राज्याची प्रगती अधिक जोमाने होईल, असे प्रतिपादन लोकेश चंद्र यांनी व्यक्त केले. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, पत्रकार पराग करंदीकर, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (वित्त) अनुदीप दिघे, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी व संचालक (मानव संसाधन) अरविंद भादिकर उपस्थित होते.

लोकेश चंद्र पुढे म्हणाले, की केंद्राच्या मदतीने राज्यात आरडीएसएस योजना राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यामुळे शेतकऱ्यांना दिवसा व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा होईल. क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार असल्याने उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना स्पर्धात्मक दराने वीज मिळण्यास मदत होईल. तसेच अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवायचा असून यामुळे वीजदर कमी होणे अपेक्षित आहे. या सर्वांचा फायदा राज्यातील उद्योगांना होईल.

मराविमं सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक म्हणाले, की राज्यात औद्योगिक व आर्थिक प्रगती साधायची असेल तर वीज हा अत्यावश्यक घटक आहे. त्याकरिता विजेचे नियोजन आवश्यक आहे. वर्धापन दिनानिमित्त प्रकाशगड येथील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता दुपारच्या सत्रात ‘मनाची अमर्याद शक्ती’ या विषयावर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी कार्यशाळा घेतली; तर सायंकाळी ‘स्वरस्पर्श’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT