मुंबई

पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना दंड

CD

तुर्भे, ता.२८ (बातमीदार): नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले असताना शहरात पाण्यासाठी आणीबाणी सुरू आहे. दिवाळीच्या आधीपासूनच अनेक भागात पाणीटंचाई असल्याने नागरिकांवर आंदोलनाची वेळ आली आहे. तर आजही अनेक भागात अनियमित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा होतो. मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस धरण भरले आहे. परंतु आजही नव्या मुंबईतील काही भाग तहानलेला दिसत आहे.भविष्यात पाणीकपातीचे संकट येऊ नये म्हणून आधीच पाणी वाचविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पाणी जपून वापरण्याबाबत नवी मुंबई महापालिकेने नोटीस काढली होती. मात्र तरीदेखील शहरात नागरिकांकडून पाण्याचा अतिरिक्त वापर होताना दिसत आहे. त्यात सध्या शहरात अनधिकृत बांधकामांना देखील पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे महापालिकेकडून आत्तापासून पाण्याचा अपव्यय होणार नाही, याकडे गांभिर्याने पाहिले जात आहे. याच अनुषंगाने जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीत पालिकेने पाण्याचा अपव्यय तसेच गैरवापर करणाऱ्या बांधकामे, नागरिक, सोसायट्यांवरील कारवाईतून जवळपास १५ लाख ८९ हजाराचा दंड वसूल केला आहे. तसेच नऊ महिन्यात ३ हजार ५१४ हुन अधिक जणांना दंड भरण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.
---------------------------
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून पाण्याचा गैरवापर होताना दिसत आहे. अशा पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर नवी मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नऊ महिन्याच्या कालावधीत जवळपास १५ लाख ८९ हजाराचा दंड वसूल केला आहे.
-मनोज पाटील, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT