मुंबई

मुंबईत उरले १० टक्के रिक्षा आणि २५ टक्के टॅक्सी स्टॅन्ड

CD

रस्ते सुरक्षा निधीतून रिक्षा आणि टॅक्सी स्टॅन्ड उभारण्याची मागणी


सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ३ : मुंबईत टॅक्सी स्टॅन्ड २५ टक्के; तर रिक्षा स्टॅन्ड १० टक्के शिल्लक राहिले आहे. त्यामुळे प्रवासी आणि रिक्षा, टॅक्सी चालकांची गैरसोय होत असून रस्ता सुरक्षा निधीतून हे स्टॅन्ड उभारावेत, अशी मागणी रिक्षा, टॅक्सीचालक संघटनांनी केली आहे. 

वाढते इंधनदर, जागेची उपलब्धता, परमीट, खासगी कॅबच्या स्पर्धेत टिकण्यासाठी धडपडणाऱ्या टॅक्सीचालकांसमोर टॅक्सी स्टॅन्ड कमतरतेमुळे अडचणींत भर पडत आहे. त्यातच पुरेसे स्टॅण्ड नसल्याने प्रवाशांना ताटकळावे लागते. शहराचा विस्तार होत असताना टॅक्सींची संख्या वाढण्याऐवजी घटत आहे. शहरातील टॅक्सीची संख्या ४० हजार, तर प्रवाशांची लाखोंच्या घरात आहे. चाकावर पोट चालवणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना स्टॅन्डमुळे आधार मिळतो. पूर्वी मुंबईत एक हजार ६५० एव्हढी असलेली टॅक्सी स्टॅण्डची संख्या आता ४५० वर आली आहे; तर ८०० च्या आसपास असणारे रिक्षा स्टँड आता १००च्या आत आले आहेत. याचा फटका प्रवाशांसह टॅक्सीचालकांनाही बसत आहे. स्टॅन्ड नसल्याने रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टॅक्सीचालकांवर वाहतूक पोलिस कारवाई करतात. त्यात दंड आकारणे, वाहन परवाना जप्तीची कारवाई होते. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात टॅक्सी स्टॅन्डचे जाळे तयार व्हावे, अशी मागणी पुढे येत आहे.


..
मुंबईत केवळ १० टक्के रिक्षा स्टॅन्ड राहिले, असून रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी रिक्षा स्टॅन्ड अत्यावश्यक आहे. रस्ता सुरक्षा निधीतून हे स्टॅन्ड उभारण्यात यावेत, असा प्रस्ताव आणि प्रशासनाला दिला आहे.
- थॅम्पी कुरियन, नेते, मुंबई रिक्षा मेन्स युनियन


..
गेल्या काही वर्षांत टॅक्सी स्टॅन्डमध्ये मोठी घट झाली आहे. सध्या २५ टक्के टॅक्सी स्टॅन्ड शिल्लक राहिले आहेत. विविध कारणांमुळे टॅक्सी स्टँड कमी होत गेले. कोरोनानंतर पालिका आणि परिवहन विभाग यांनी टॅक्सी स्टॅन्डसाठी पुढाकार घेतला नाही.   
- के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा टॅक्सी सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक! आपले सरकार सेवा केंद्रात घेऊन जावा आधारकार्ड, ॲग्रीस्टॅक क्रमांक, मगच पैसे जमा होतील; याद्यांमध्ये आडनावे, गावांची नावे चुकली

Rahul Gandhi: विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा आदेश कोणी दिला? गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे राहुल गांधी यांची विचारणा

आजचे राशिभविष्य - २७ जुलै २०२६

Kulith Soup: पावसाळा स्पेशल हुलग्याचं माडगं! सर्दी-खोकल्यासाठी घरगुती आणि पारंपरिक उपाय

आजचे शास्त्रशुद्ध पंचांग 27 जुलै 2026! तिथी, योग आणि शुभ-अशुभ वेळा

SCROLL FOR NEXT