मुंबई

ST News: हॉटेल चालकांकडून लूट सुरूच, दोन इडल्या ८० तर वडापाव ५० रु..!

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: एसटी महामंडळाकडून आपल्या अधिकृत बसथांब्यांवर प्रवाशांच्या सोयीसाठी अवघ्या ३० रुपयांमध्ये चहा-नाश्ता देण्यात येतो. मात्र, काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने महामंडळाने आता कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

मात्र, तरीही काही हॉटेलचालक एसटीच्या नाश्त्याचा बोर्ड कोपऱ्यात ठेवून जास्तीचा दर दाखवत प्रवाशांना लुबाडत आहेत. तसेच प्रवाशांना बिल देताना टाळाटाळ केली जात आहे.

बसस्थानकातील हॉटेलचालक जास्तीचे दर घेऊन नाश्ता देत असेल तर त्याची तक्रार एसटी महामंडळाकडे करता येते. मात्र, महामंडळाचे अधिकारी कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे बसस्थानकातील हॉटेलचालकांची हिंमत वाढत चालली आहे. एसटी महामंडळाने अधिकृत बसथांब्यावर ३० रुपयांत चहा-नाश्ता न दिल्यास हॉटेलचालकवर कारवाई करण्यात येणार असल्याचे काढले होते.

त्याशिवाय महामंडळाचे उत्पादन असलेले नाथजलदेखील छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. ठरलेल्या दरात नाश्ता आणि नाथजल उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने वाहतूक पर्यवेक्षक आणि आगार व्यवस्थापकांवर जबाबदारी निश्चित केली आहे.

संबंधित खासगी हॉटेलचालक अंमलबजावणी करतात की नाही, याची खातरजमा करण्याची सूचना मार्गतपासणी पथक, वाणिज्य आस्थापन आदी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्याशिवाय एसटी महामंडळाचे ‘नाथजल’ छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत नाही, याची खातरजमा करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

नाश्‍ता, चहा ३० रुपयांना


एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, एसटीच्या प्रवाशांसाठी करार करण्यात आलेल्या खासगी हॉटेलमध्ये शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली आदींपैकी एक पदार्थ आणि चहा असा नाश्ता ३० रुपयांना द्यावा लागणार आहे, तर एसटी महामंडळाचे ‘नाथजल’ या मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी १५ रुपये आकारण्यात येत आहे. यामध्ये विक्रेत्याने कुलिंग चार्ज अथवा इतर कारणाने छापील किमतीपेक्षा अधिक दर आकारू नये, असे आदेश महामंडळाने दिले आहेत. त्याचे पालन केले जात नाही.

कोट अहमदनगरवरून मुंबईला येणारी बस लोणावळा फूड प्लाझा येथे थांबवण्यात आली होती. बाहेरगावचे प्रवासी राहत असल्याने ते जास्त भाव करू शकत नाही. तसेच जवळ असलेल्या हॉटेलमध्ये थोडाफार नाश्ता करून बसमध्ये बसण्याची घाई असते. याचा गैरफायदा हॉटेलचालक उचलतात. खरे तर त्यांनी प्रवाशांना सवलतीत नाश्ता देणे आवश्यक आहे. मात्र, अधिकचे पैसे वसूल केले जातात.


-सुमित तनपुरे, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT