मुंबई

तुर्भेतील हुक्का पार्लरवर कारवाई

CD

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : बेकायदेशीर हुक्का पार्लर चालवणाऱ्या तुर्भे येथील टॉम स्काय नावाच्या बारवर पोलिसांनी मंगळवारी (ता. २३) छापा टाकला. या वेळी पार्लरचा चालक आणि नोकर अशा चार जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ठाणे-बेलापूर मार्गालगत तुर्भे येथे असलेल्या अरिहंत टॉवरमधील दुसऱ्या मजल्यावर टॉम स्काय बार व क्लबमध्ये छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी कारवाई करण्याचे आदेश आपल्या पथकाला दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश येवले व त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास टॉम स्काय बार व क्लबवर छापा मारला. या वेळी बारमध्ये काही व्यक्ती हुक्का ओढत बसल्याचे तसेच नोकर ग्राहकांना हुक्का पुरवीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या कारवाईत हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे हुक्का फ्लेवर जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी बारचा चालक चैतन्य अंकुश भोसले व हुक्का पुरवणारे नोकर साजिद मोहमद हारून शेख, सुरज पिल्ले, जावेद फारूक पठाण या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT