मुंबई

म्हाडाची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाने आता मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी खासगी विकासकांप्रमाणे सुविधांनी परिपूर्ण घरे बांधली आहेत. स्वीमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्किंग अशा हायफाय सुविधा असलेला म्हाडाचा हा पहिलाच प्रकल्प असून अलिशान घरांची विक्री एक कोटी १० लाख ते एक कोटी ४० लाखांना होणार आहे.
म्हाडातर्फे गोरेगावच्या प्रेमनगर येथे ३९ मजली टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत या टॉवरच्या २९ मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. यात मध्यम उत्पन्न गटासाठी सुमारे ८०० चौरस फुटांची २२७, तर उच्च उत्पन्न गटासाठी सुमारे १००० चौरस फुटांचे १०५ फ्लॅट असणार आहेत. सुरुवातीला मार्च २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट म्हाडाने आखले होते, मात्र कामाने पकडलेला वेग पाहता वर्षाअखेरीस हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलैअखेरीस म्हाडाकडून मुंबईतील सुमारे १,९०० घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.
-----------------------------------------
किमतींमध्ये फेरबदलाची शक्यता
मध्यम उत्पन्न गटातील घराची किंमत एक कोटी १० लाख, तर उच्च उत्पन्न गटातील घरांच्या किमती एक कोटी ४० लाखांच्या दरम्यान असतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली, पण प्रत्यक्ष लॉटरीच्या वेळी या घरांच्या किमती कमी-जास्त होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT