मुंबई

अकरावीच्या विशेष फेरीकडे पाठ

CD

अकरावीच्या विशेष फेरीकडे पाठ
मुंबईत १ लाखाहून अधिक जागा असताना केवळ ७ हजार विद्यार्थ्यांना ॲलोटमेंट
मुंबई, ता. १० : मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या पाच महापालिका क्षेत्रात अकरावीच्या प्रवेशासाठीच्या विशेष डीएमआर फेरीची गुणवत्ता यादी आज (ता. १०) जाहीर झाली. यात मुंबईसह पुणे आदी महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ दाखवली असल्याचे समोर आले आहे. त्‍यामुळे अकरावी प्रवेशाच्या लाखो जागा उपलब्ध असतानाही या फेरीत पात्र ठरलेल्या काही हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाचे ॲलोटमेंट मिळाले आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या डीएमआर या विशेष फेरीसाठी एक लाख आठ हजार ३३५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी केवळ नऊ हजार ३८८ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले होते. त्यातील केवळ सात हजार ६०० विद्यार्थ्यांना ॲलोटमेंट मिळाले आहे. यात पहिल्या पसंतीक्रमाची सहा हजार २१३ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत, तर दुसऱ्या पसंतीची ५६७ विद्यार्थ्यांना आणि तिसऱ्या पसंतीक्रमाची २८८ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत. या डीएमआर फेरीनंतरही मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एक लाख आठ हजार ३३५ जागांपैकी तब्बल एक लाख ७३५ जागा रिक्त राहिल्या आहेत. त्‍यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कल कमी झाला असल्याने ही प्रवेशप्रक्रिया थांबवून अकरावीचे नियमित वर्ग सुरू करण्याची मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून केली जात आहे.
अकरावीची प्रवेशप्रक्रिया ही मागील काही वर्षांत प्रवेशासाठी असलेल्या नियमांना डावलून केली जात आहे. या प्रक्रियेत कुठेही डीएमआर नावाच्या फेरीचे आयोजन करण्याची तरतूद नसतानाही ती का केली जात आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. जूनपासून सुरू झालेली ही प्रवेशाची प्रक्रिया तातडीने थांबवून अकरावीचे नियमित वर्ग सुरू करावेत, अशी मागणीही केली जात आहे, तर दुसरीकडे शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा डीएमआर फेरीसाठी वेळापत्रक जाहीर करण्याचे स्पष्ट करून त्यासाठी विद्यार्थ्यांनी ते पाहण्याचे आवाहन केले आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केंद्रीय प्रवेशप्रक्रियेत एकदा प्रवेश निश्चित केला असेल, त्यांना पुढील डीएमआर फेरीच्या प्रवेशासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

डीएमआर फेरीतील शाखानिहाय प्रवेश.
शाखा उपलब्ध जागा ॲलोटमेंट विद्यार्थी
कला २११७४ ८११
वाणिज्य ५४०५६ ४५४३
विज्ञान ३११५० २१११
एचएसव्हीसी १९५५ १३५
एकूण १०८३३५ ७६००
---
मुंबईतील कोटानिहाय रिक्त जागा
प्रवर्ग उपलब्ध जागा रिक्त जागा
सर्वसामान्य वर्ग ४५६७५ ४१,२१२
अनुसूचित जाती ६०२६ ५,५३७
अनुसूचित जमाती ६२०५ ५,७६७
सीईबीसी ११५७१ १११०८
ईडब्ल्यूएस १२६४२ १२,४४८
ओबीसी १६०२४ १५,०२९
एसबीसी २०३९ १,९१४
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon child shopping: आता बोला...! आई-वडील झोपेतच अन् तिकडं त्यांच्या लाडक्या चिमुकल्यानं चक्क 'अमेझॉन'वर केली अडीच लाखांची खरेदी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

SCROLL FOR NEXT