बविआचे उमेदवार सुरेश पाडवी भाजपमध्ये दाखल
कासा, ता. १९ (बातमीदार) : ऐन निवडणुकीच्या आदल्यादिवशी डहाणू विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपत प्रवेश केला आहे. पाडवी यांनी मंगळवारी (ता. १९) भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची भेट घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार विनोद मेढा यांना आपला पाठिंबा जाहीर करत आपल्या कार्यकर्त्यांना व मतदारांना मेढा यांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सुरेश पाडवी यांच्या भाजप प्रवेशामुळे डहाणू मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. पाडवी हे बहुजन विकास आघाडीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष होते. डहाणूमध्ये त्यांचा चांगला प्रभाव असल्याने बहुजन विकास आघाडीने त्यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली होती; मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या भाजप प्रवेशामुळे, बहुजन विकास आघाडीने आपला प्रभाव गमावल्याचे मानले जात आहे. याठिकाणी भाजपची ताकद वाढल्यामुळे निवडणुकीत नवे गणित तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.