मुंबई

रसायनीत कडधान्यांच्या पेरणीला सुरूवात

CD

रसायनीत कडधान्यांच्या पेरणीला सुरुवात
रसायनी, ता. १९ (बातमीदार) : रसायनी परिसरात यंदाच्या खरिपाच्‍या हंगामानंतर शेतकऱ्यांनी दुबार कडधान्यांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. परिसरात अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे कडधान्यांच्या पेरणीच्या कामांनी जोर धरला आहे. दिवसा कोरडे व रात्री थंडी असल्याने हे वातावरण रोपांच्या वाढीकरिता उत्तम असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
परिसरातील वडगाव, चावणे, आपटे, मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामानंतर दुबार कडधान्यांचे पीक घेतात. यामध्ये वाल, चवळी, हरभरा, मूग, मटकी आदी प्रकारच्या कडधान्यांचे पीक घेतले जाते. यात वालाच्या पिकाचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच, सिंचनाचा आधार असलेले शेतकरी भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतात. खरिपाच्या हंगामातील पिकाच्या कापणीनंतर शेतात पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्यावर शेतकऱ्यांनी दहा-बारा दिवसांपासून कडधान्यांच्या पेरणीची कामे सुरू केली आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात तीन-चार दिवस हवामानात बदल झाला होता. आकाश ढगाळलेले होते, तर तापमानात वाढ झाली होती; मात्र या खराब हवामानाचा रोपांवर फारसा परिणाम होणार नाही, असे शेतकरी हरी गडगे यांनी सांगितले आहे. परिसरात नुकतीच भातकापणी झाल्यामुळे कडधान्य पेरण्या केल्या आहेत, असे शेतकरीवर्गाकडून सांगण्यात येत आहे. काहींच्या शेतात बियाणे उगवले असून रोपे दिसू लागली आहेत. तसेच, दुबार कडधान्य पेरणीच्या शेतात टोचे मारून बियाणे टाकणे, शेतात बियाणे फेकणे, तसेच त्‍यानंतर नांगरणी करणे आदी कामे सुरू असल्याचे कृषिमित्र सुदाम कडपे यांनी सांगितले. यंदा कडधान्यांचे पीक चांगले येईल, अशी आशा व्‍यक्‍त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT