मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

थोडक्‍यात बातम्या रायगड
वडगाव शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप
रसायनी ता. २४ (बातमीदार) : रसायनीतील पाताळगंगा औद्योगिक परिसरातील वडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेला एक्झॉनमोबिल कंपनीकडून शैक्षणिक साहित्‍याचे वाटप करण्यात आले. एक्झॉनमोबिल कंपनीच्या अगस्त्य फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना दप्तर, पाणी बॉटल, वह्या, कंपास, पेन व स्वयं अध्ययन पुस्तिका आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी एक्झॉनमोबिल कंपनीचे प्रमुख मयुरेश महाजन, शिवम चौबे, श्रीराम अय्यर, वृषाली सक्सेना व अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रमुख पराग सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी अनेकांनी सहकार्य केले, तर वडगाव शाळा आदर्श शाळा म्हणून ओळखली जात आहे.
....................
रसायनी परिसरात उदमांजराची दहशत
रसायनी (बातमीदार) : रसायनीतील चांभार्ली गावाच्या हद्दीत पाताळगंगा नदीत हिंस्र उदमांजराच्‍या वावरामुळे दहशत पसरली आहे. येथील नदीत मासेमारीसाठी गेलेल्या एका व्‍यक्‍तीला उदमांजराने चावा घेतल्याने त्‍याला गंभीर इजा झाल्याची घटना समोर आली आहे. त्‍यामुळे नदीवर पोहायला, मासेमारी करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उदमांजराला पाणमांजर म्हणूनही ओळखले जाते. उदमांजराचा वावर किंवा अधिवास प्रामुख्याने नदीकिनारी आणि खारफुटीच्या जागी असतो. उदमांजर मासे, खेकडे आणि शिंपल्यांना खाऊन जगतात. क्वचितच छोटे पक्षी आणि सस्तन प्राणी खातात. भारतात उदमांजरांना नेहमीच संरक्षण देण्याच्यादृष्टीने बघितले गेले आहे. त्‍यामुळे त्‍यांची शिकार करणे बेकायदा असून वन विभागअंतर्गत गुन्‍हादेखील दाखल करण्यात येतो, मात्र सध्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे उदमांजरांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याचे प्राणिप्रेमींकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाताळगंगा नदीवर गेल्या काही दिवसांपासून एका उदमांजराचा वावर वाढला आहे. येथील काशीनाथ मुंढे (वय ५५) हे नदीत मासेमारीसाठी गेले असता त्‍यांच्‍या पायाचा चावा या उदमांजराने घेतला. या वेळी त्‍यांनी धाडसाने त्‍याला पळवून लावले, मात्र त्‍यांच्‍या पायाला गंभीर दुखापत झाली. त्‍यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT