मुंबई

वातावरणातील गारव्याने मासळी गारठली

CD

तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : काही दिवसांपासून वातावरणात गारठा वाढला असून समुद्रातील तापमानही कमी झाल्याने खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. त्यामुळे मासळीची आवक ४० टक्क्यांपेक्षा अधिक घटली आहे. परिणामी, मासळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे खवय्यांबरोबर मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत. या स्थितीत मासेमारीसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
बदलत्या वातावरणाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम होतो. त्यानुसार सध्या वातावरणातील गारव्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना आवश्यक त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांनी केलेला खर्चही निघत नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या थंडीचा गारवा वाढल्याने पुन्हा एकदा मच्छीमारांवर संकट आले आहे. खोल समुद्रातील मासेमारीच्या एका फेरीसाठी लाखाहून अधिक रुपयांचा खर्च येतो. सध्या गारठा वाढल्याने ताज्या मासळीची आवक घाटली आहे. त्यामुळे मासळीचे भावदेखील वाढले आहेत. नवी मुंबईतील खाडीकिनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठ्यामुळे कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो. त्यात गारठा वाढला की समुद्रातील तापमानही कमी होते. त्यामुळे खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे.
------------------
दिवसभराची मेहनत वाया
नवी मुंबईतील बहुतांश मच्छीमार हे मुंबई येथील भाऊचा धक्का व कुलाबा येथून ताजी मासळी खरेदी करतात; मात्र त्या मासळीचीदेखील आवक कमी झाल्याने त्यांनादेखील भाववाढीचा फटका बसला आहे. एकीकडे गारठा वाढला; तर दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा सगळा फटका मासळीच्या आवकेवर होतो. त्यामुळे कमी मासळी मिळत असल्याने त्यांचे भावही वाढले आहेत. दिवाळे खाडीपासून ते ऐरोली खाडीपर्यंत मासेमारी केली जाते. या खाडीतून मासे, निवढी, बोईस, कोळंबी तसेच चिवणी मिळतात; पण गारठा वाढल्याने त्यांचीदेखील आवक खूपच कमी झाली आहे. त्यामुळे मच्छीमारबांधवांची दिवसभराची मेहनत वाया जात असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
------------
मांदेली आणि बोंबील हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे व परवडणारे मासेसुद्धा महाग झाले आहेत. त्यात वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. परिणामी, मासळीची आवक घटली असून भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत.
- कविता मढवी, मासे विक्रेती
-------------------
सध्याचे मासळीचे भाव
माशाचा प्रकार किलोचे भाव (रु.)
पापलेट १,२००
सुरमई १,२००
बोंबील २०० (सहा नग)
कोळंबी ६००
जिताडा १,२००
रावस १,५००
घोळ १,३००
हलवा १,२००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT