घणसोलीत फटाकेविक्रेत्यांकडून पालिकेचे नुकसान
विनपरवानगी पदपथावरील काढले संरक्षण ग्रिल; नागरिकांमध्ये नाराजी
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) ः दिवाळीमध्ये नवी मुंबई महापालिकेकडून फटाकेविक्रेत्यांसाठी ठिकठिकाणी तात्पुरते स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. सदरचे स्टॉल हे रस्त्याच्या कडेला उभारण्यात आले होते. घणसोली येथे ग्राहकांना फेरा मारून स्टॉलमध्ये यावे लागत होते. त्यामुळे स्टॉलधारकांनी चक्क पदपथावर असणाऱ्या संरक्षण ग्रिलच काढून टाकल्याचे समोर आले आहे. या घटनेला एक महिना उलटून गेला तरी अद्यापही ग्रिल बसविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पालिकेचे अतोनात नुकसान झाले असून, पदपथावरील संरक्षण ग्रिल काढून टाकण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी दिवाळीत नवी मुंबई महापालिकेकडून फटाकेविक्रेत्यांना विविध ठिकाणी शहरात तात्पुरते स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतात. घणसोली सेक्टर ११ येथील जय मल्हार सोसायटीच्या समोर असलेल्या चिंचोली जागेवर पालिका विभाग कार्यालयाने सुरक्षित असे फटाकेविक्रेत्यांना स्टॉल उपलब्ध करून दिले, मात्र सदरील स्टॉलसमोर लोखंडी ग्रिल असल्याने ग्राहकांना ये-जा करण्यास अडचण येत होती. त्यांना मोठा फेरा मारून स्टॉलमध्ये यावे लागत होते. ही अडचण लक्षात घेता, येथील स्टॉलधारकांनी पदपथावरील लोखंडी ग्रिल पालिकेची कोणतीही परवानगी न घेता काढून टाकले आहेत. त्यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. नागरिकांच्या संरक्षणासाठी पालिकेने अनेक पदपथावर लोखंडी ग्रिल लावले आहेत, मात्र येथील विक्रेत्यांनी सदरील लोखंडी ग्रिल काढल्याने पादचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, तसेच फटाके व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
.....................
लॉक सिस्टीम...
पालिकेने ज्या ग्रिल लावल्या आहेत. त्या ग्रिलला संबंधित विक्रेत्यांनी लॉक सिस्टीम केली आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळी आली की, मालकी हक्काप्रमाणे ही मंडळी ग्रिल काढण्याचा उद्योग करत असतात.
....................
ज्या प्रकारे पालिकेने कार्यान्वित केलेले ग्रिल काढले जात आहे, यावर तीव्र कारवाई करणे गरजेचे आहे. जर त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर इतरही व्यावसायिक असाच प्रकार करतील. म्हणून पालिकेला उपहासात्मक पत्र देऊन सर्व व्यावसायिकांच्या समोर असलेले ग्रिल काढून टाकण्याची मागणी केली आहे.
ॲड. गणेश देशमुख, प्रदेश सचिव, कामगार मोर्चा, भाजप
.......................
घणसोली येथील पदपथावरील काढलेल्या लोखंडी ग्रिल अभियांत्रिकी विभागाला लावण्यास सांगितल्या जातील. त्यानंतर अधिक तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल.
शिरीष आरदवाड, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.