मुंबई

बेशिस्त चालकांसाठी ''टायर किलर'' मोहीम

CD

बेशिस्त चालकांसाठी ‘टायर किलर’ मोहीम
ठाणे, ता. ७ (वार्ताहर) : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी यासाठी प्रथमच रामबाण उपाय आता हाती घेतला आहे. ठाणे शहरात लवकरच ‘टायर किलर’ लावण्यात येणार आहेत. सर्वप्रथम ही यंत्रणा ठाणे शहरातील शिवाजी पथ येथे लावण्यात येणार आहे. ‘टायर किलर’ यंत्रणा विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासाठी आधी फलकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.

ठाणे परिसरातील काही मार्ग हे वन वे आहेत; मात्र दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक वेळ वाचविण्यासाठी शहरातील वन वे असलेल्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालवतात. यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच, काही प्रमाणात अपघातही होतात. वाहनचालकांची मुजोरी आणि अपघात टाळण्यासाठीच रामबाण उपाय म्हणून वाहतूक शाखेच्या वतीने ‘टायर किलर’ मोहीम ठाण्यात सुरू होणार आहे.

मोहिमेची सुरुवात रविवारी
‘टायर किलर’ ही मोहीम रविवारपासून सुरू होणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग उपायुक्त शिरसाट यांनी दिली. ठाणे शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शिवाजी पथ, समर्थ भांडार, दादा पाटील वाडी रोड, स्टेशन रोड या ठिकाणी मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

वाहनचालक मुजोरी करीत वेळ वाचविण्यासाठी सिग्नल तोडतात; मात्र या सगळ्या वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास, तसेच शहरात सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे याला आळा बसल्यास ५० टक्क्यांपेक्षा जास्त अपघातांची संख्या घटण्यास मदत होईल.
- पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT