मुंबई

थोडक्‍यात बातम्या रायगड

CD

थोडक्‍यात बातम्या रायगड
लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
माणगाव (बातमीदार) ः महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्‍यांच्या पुतळ्याला तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, या अभिवादन व श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद किवळेकर, अधिष्ठाता शैक्षणिक डॉ. एस. एल. नलबलवार, अधिष्ठाता संशोधन आणि विकास डॉ. एस. एम. पोरे, तसेच विद्यापीठाचे सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आला.
.................
पेणमध्ये पथनाट्यातून अभिवादन
पेण (वार्ताहर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील त्‍यांच्या पुतळ्यास अनेक सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. तसेच, यावेळी महात्मा गांधी ग्रंथालय, वाचनालय येथेही शासकीय विश्रामगृहातील मुलींनी भारताचे संविधान या विषयावर पथनाट्याद्वारे बाबासाहेबांना अभिवादन केले. तर, पेणच्या डॉ. पतंगराव कदम कॉलेज येथेसुद्धा महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कॉलेजचे प्राध्यापक एल. एन. कुमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील कार्यकर्तृत्वाची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ, डॉ. विनायक पवार, प्रा. अनिल वळवी, महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे, पीआरपी जिल्हाध्यक्ष सिताराम कांबळे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा सोनवणे, प्रभाकर घायतले, भास्कर पाटील आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......................
महात्‍मा गांधी ग्रंथालयात विविध कार्यक्रम उत्‍साहात
पेण (बातमीदार) ः महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालय पेण येथे शुक्रवारी (ता. ६) भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्‍साहात पार पडले. यावेळी भारताच्‍या संविधानाबाबत पथनाट्याद्वारे माहिती सादर करण्यात आली. आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह देवनार येथील आदिवासी मुलींनी भारतीय संविधानावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमाच्या समारोपात सर्व मुलींना पेन भेट देण्यात आले. महात्मा गांधी स्मारक संस्थेचे अध्यक्ष अरविंद वनगे व संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य कर्मचारी वर्ग व वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
...................
श्रीवर्धनमध्ये डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन
श्रीवर्धन (वार्ताहर) ः येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बौद्ध हितकारणी सभा तालुका श्रीवर्धन रायगड या संस्थेच्या वतीने शुक्रवारी (ता. ६) महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार महेंद्र वाकलेकर व पोलिस निरीक्षक उत्तम रिकामे यांनी उपस्थित राहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व उपस्थितांना ६ डिसेंबर या दिवसाचे महत्त्व सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष यशवंत लोखंडे, उपाध्यक्ष मुकुंद जाधव व हरिभाऊ तांबे, कार्याध्यक्ष एच. आर. जाधव, सरचिटणीस दीपक शिर्के, चंद्रकांत हुंदिलकर, अशोक सावंत, एकनाथ जाधव, विलास चाफे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शन केले‌. महिला अध्यक्ष मानसी साखरे, उपाध्यक्ष उर्मिला जाधव, सरचिटणीस मेघा शिर्के, अरुणा येलवे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे सरचिटणीस शिर्के यांनी आभार प्रदर्शन करून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाची सांगता केली.
...................
खडकोली केंद्राच्या क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा उत्साहात
माणगाव (बातमीदार) ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील मार्गदर्शक सिद्धांतानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे व त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कला, अभ्यासेत्तर उपक्रम, खेळ यांच्याद्वारे संवाद, सहकार्य, सामूहिक कार्य आणि लवचिकता अशी जीवनमूल्ये रुजवण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या वतीने क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्‍पर्धा खडकोली केंद्रातील रा.जि.प. शाळा पहेल येथे स्पर्धा उत्साहात पार पडल्या. केंद्रातील एकूण १२ शाळांनी अतिशय चांगल्याप्रकारे मुलांची तयारी करून घेतली होती. वैयक्तिक क्रीडा प्रकारात दोरीवरील उड्या, मातीपासून शिल्प तयार करणे, बेचकीने नेम धरणे इत्यादी खेळ व सामूहिक क्रीडा प्रकारात मुलींसाठी लंगडी, समूहगीत, समूहनृत्य, पथनाट्य व लगोरी हा खेळदेखील समाविष्ट होता. प्रत्येक क्रीडा प्रकारात लहान गट व मोठा गट अशा दोन गटांत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. उद्घाटनप्रसंगी पहेल सरपंच करिश्मा प्रसाद मांजरे, उपसरपंच हरदास खराडे, ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बजरंग खराडे, सुनील खराडे उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. शेवटी सर्व विजेत्यांना खडकोली केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT