पनवेल, ता. ६ (बातमीदार) : पनवेलसह खांदेश्वर, तळोजा, उरण, कामोठे पोलिस ठाणे हद्दीतील ४७ जणांचे चोरीला गेलेले आणि हरवलेले मोबाईल पनवेलच्या गुन्हे शाखा कक्ष दोनने शोधून नागरिकांना परत केले आहेत. पनवेल तालुक्यातील अनेक नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते; तर काहींचे फोन चोरीला गेले होते. या वेळी पनवेलच्या गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊन सीईआयआर पोर्टलवरून महिती प्राप्त केली आणि अंदाजे ११ लाखांचे ४७ मोबाईल शोधून काढले. सोमवारी (ता. ६) हे सर्व मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले. चोरीला गेलेले आणि हरवलेल्या मोबाईलची तक्रार नागरिकांनी सीईआयआरवर दाखल करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.