मुंबई

श्री स्वयंभू शिवलिंग गणपती मंदिर साले दुर्लक्षित

CD

श्री स्वयंभू शिवलिंग गणपती मंदिर साले दुर्लक्षित
माणगाव, ता. १६ (बातमीदार) ः रायगड जिल्‍ह्यातील साले आणि तिलोरे या गावातील प्रसिद्घ असलेले स्‍वयंभू शिवलिंग गणपती मंदिर मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या ३०० मीटरवर आहे; मात्र हे मंदिर दुर्लक्षित असल्याने भाविकांकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
ज्‍या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग स्थान प्रकट झाले, त्या ठिकाणी स्‍थानिक रहिवासी शैलेश भोनकर यांचा गुरांचा गोठा होता. या जागेच्या आजूबाजूस शैलेश भोनकर यांच्या घरातील व्यक्तींना सापाचे दर्शन होत होते. या स्वयंभू स्थानाबाबत वारंवार परिवारातील व्यक्तींना अनुभूती येत होती. तसेच महिपत यांच्या स्‍वप्नात येऊन मला सावली पाहिजे, असे सांगण्यात येत होते; परंतु हे स्थान कोठे आहे, याबाबत माहिती मिळत नव्‍हती. काही जाणकारांच्या मदतीने शुक्रवार ६ जानेवारी २००६ रोजी या परिसराची स्वच्छता केल्यावर श्री स्वयंभू शिवलिंग दृष्टीस पडले. या लिंगाच्या बाजूलाच श्री गणेशाचे मोहक दर्शन घडले. शैलेश महिपत भोनकर यांनी या ठिकाणी एक छोटेसे मंदिर बांधले. तेव्हापासून या गणपतीची महती पंचक्रोशीत पसरली. हे प्रकट झालेले शिवलिंग व गणेशमूर्ती नैसर्गिक असून त्‍यात कोणताही कृत्रिम बदल केलेला नाही. अनेक भाविकांच्या या चिंतामुक्ती गणेशाच्या कृपादृष्टीने मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. माघी गणेश जयंती व संकष्ट चतुर्थीला या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते; मात्र सध्या हे मंदिर दुर्लक्षित असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यभरात आज गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा होणार

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

India Pakistan Nuclear Risk : भारत-पाकिस्तान अणुयुद्ध कधीही पेटू शकते, कोणी केला खळबळजनक दावा?

Panchang 19 March 2026: आजच्या दिवशी बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT