मुंबई

गुन्हेगारांचा मौजमस्तीचा अनोखा फंडा

CD

मौजमस्तीसाठी रिक्षाची चोरी
उल्हासनगर गुन्हे शाखेकडून दोन सराईत गुन्हेगारांना अटक

उल्हासनगर, ता. १९ ( वार्ताहर ) : शहरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी उल्हासनगर गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत दोन सराईत चोरांना अटक केली आहे. हे दोघे गुन्हेगार आपल्या मौजमस्तीसाठी चोरी करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यांत अर्धा डझनहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

उल्हासनगर गुन्हे शाखेतील कर्मचारी सुरेश जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन संशयित व्यक्ती चोरी केलेल्या रिक्षासह बदलापूर परिसरात फिरत आहेत. याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे, हेड कॉन्स्टेबल शेखर भावेकर, सतीश सपकाळे, विजय जीरे आणि पोलिस हवालदार प्रसाद टोंडीलकर यांच्या पथकाने सापळा रचून या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी संतोष गुरुराज पाटील (२७) आणि संजय अनिल मकवाना (२३) हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी पोलिसी तपासादरम्यान दोन रिक्षा आणि एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे हे दोघे गुन्हेगार एकत्र येऊन घरफोडी, चोरी, जबरी चोरी आणि मारहाणीचे गुन्हे करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

दोघांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतून एक रिक्षा चोरली होती. ती घेऊन बदलापूरकडे मौजमस्ती करण्यासाठी निघाले; मात्र प्रवासादरम्यान चोरी केलेली रिक्षा पलटी झाल्याने तिच्यासमोरील काचा फुटल्या. त्यामुळे रिक्षा तिथेच सोडून दोघांनी लगेचच जवळच उभी असलेली दुसरी रिक्षा चोरली आणि पसार झाले. त्याचप्रमाणे उल्हासनगरच्या डर्बी हॉटेलजवळून मुकेश धनवानी या नागरिकाची दुचाकीही त्यांनी चोरली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आरोपींना बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT