मुंबई

अग्नी सुरक्षेसाठी गुरखा वाहने

CD

पालघर, ता. १८ (बातमीदार) : राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बळकटीकरण करण्यासाठी पालघर आणि डहाणू नगर परिषदेकरिता मिनी गुरखा वाहने प्राप्त झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे हस्ते सोमवारी (ता. १७) करण्यात आले. या वेळी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम, पालघर व डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. गाडीचा उपयोग छोट्या प्रकारच्या आग विझवण्यासाठी होणार आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा ताफा, तसेच शोध व बचाव कार्यासाठी, वाहन अपघातात बचावासाठी मदत होणार आहे.

आधुनिक सुविधा
२० टनापर्यंत वजनाची गाडी लिफ्ट करण्यासाठी स्टेपनी असून ५० लिटर फोमच्या साह्याने केमिकल आग विझवण्यात येते, तसेच ३०० लिटर पाणी क्षमतेचे अतिउच्च दाबाची टाकी असून, सतत २० मिनिटे फवारा करू शकतो, अशा विविध वैशिष्ट्यापूर्ण गुरखा गाड्या प्राप्त झालेल्या आहेत. तसेच अग्निसुरक्षेसाठी उच्च गुणवत्तेचे गणवेशही देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT