मुंबई

शिवसह्याद्रीतर्फे गुढीपाडवा शोभायात्राचे आयोजन

CD

शिवसह्याद्रीतर्फे गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन
वरळीच्या जांभोरी मैदानातून होणार प्रारंभ
मुंबई, ता. १८ : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शिवसह्याद्री फाउंडेशनच्या वतीने आम्ही वरळीकर या संकल्पनेतून भव्य गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे पंधरावे वर्ष असून, रविवारी (ता. ३०) सकाळी ८:०० वाजता पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, आकर्षक गुढ्या आणि विविध देखाव्यांसह ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
यंदाच्या शोभायात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा सन्मान म्हणून शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या शालेय मुलांना व महिलांना उपयुक्त अशी मराठी पुस्तके भेट देण्यात येणार आहेत. तसेच वरळी विभागातील स्थानिक मराठी लेखक, कवी आणि पत्रकारांचा विशेष गौरव केला जाणार आहे.
शोभायात्रेत वारकरी भजनी मंडळांचा भक्तिमय गजर, महिला लेझीम पथक, साई पालखी सोहळ्याची भव्य मिरवणूक, ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य चित्ररथ तसेच रामायणातील राम-सीता यांचे जीवनदर्शन घडवणारा देखावा हे प्रमुख आकर्षण असणार आहे.
शोभायात्रेतून मराठी भाषेच्या प्रचारासाठी मराठी भाषेतील घोषवाक्य, पंचलाइन आणि प्रेरणादायी फलक तयार करण्यात येणार आहेत. हे फलक आणि घोषवाक्ये शोभायात्रेत प्रदर्शित करण्यात येणार असून, मराठी वाचा, मराठी बोला, मराठी लिहा हा संदेश देण्यात येणार आहे.
यात्रेच्या आकर्षणात भर घालण्यासाठी तरुण-तरुणींनी पारंपरिक मराठमोळ्या वेषात अभिमानाने फेटे परिधान करून सहभागी व्हावे आणि या सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शोभायात्रेची सुरुवात ऐतिहासिक जांबोरी मैदान येथून सकाळी आठ वाजता होणार असून, डाॅ. जी. एम. भोसले मार्गावर जाणार असल्याचे शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय कदम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT