मुंबई

नवी मुंबईत डासांचा उपद्रव

CD

नवी मुंबईत डासांचा उपद्रव
आजारांच्‍या प्रमाणात वाढ; औषध फवारणी करण्याची मागणी
तुर्भे, ता. १८ (बातमीदार) ः नवी मुंबईत वातावरण बदलामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यापासून शहरी भागाबरोबर गावठाण भागात डासांची भुणभुण वाढली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, सर्वत्र औषध फवारणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. शिवाय वाढत्या डासांमुळे आजारांचे प्रमाण वाढले असून. पालिकेसह खासगी रुग्णालयांत रुग्णांची संख्या वाढली आहे.
पालिका हद्दीत गावठाण भागात सांडपाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणा सक्षम नसल्याने अनेक ठिकाणी गटारांची दुर्दशा कायम आहे. सुका आणि ओला कचरा वर्गीकरण ही संकल्पना गावठाण भागात योग्यरीत्या राबवली जात नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. या घाणीमुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, त्‍याला दमट हवामानदेखील कारणीभूत ठरत आहे. त्‍यामुळे अनेक रहिवासी वसाहती, झोपडपट्टी, बैठ्या चाळींमध्ये डासांची संख्या अचानक वाढली आहे. संध्याकाळ होताच डासांमुळे नागरिक हैराण होत असून घराची दारे, खिडक्‍या बंद केल्या जात आहेत. अनेक मैदाने, उद्यानांत सायंकाळी सहानंतर डासांची भुणभुण वाढल्याने नागरिकांनी जाणे बंद केले आहे. डासांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्‍यांना अटकाव करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने डासअळी नाशक फवारणी आणि धुरीकरण कार्यक्रम राबवला जातो. पावसाळ्यानंतर मात्र हा कार्यक्रम थंडावतो. सध्या धुरीकरण आणि औषध फवारणी वेळेवर होत नसल्याने हा त्रास वाढला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पुन्‍हा महापालिकेने धुरीकरण तसेच औषध फवारणी सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. नवी मुंबईत अनेक ठिकाणी इमारतींच्या पुनर्बांधणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठवले जाते. येथे सर्वाधिक डासांची उत्पत्ती ठिकाणे असण्याची शक्यता जागरूक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने यावर उपाययोजना कराव्यात आणि बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.
.......................
मलेरियाचे पाच रुग्ण
नवी मुंबई महापालिकेच्‍या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १३ फेब्रुवारीपर्यंत शहरात ३१,९२८ जणांची मलेरिया तपासणी झाली असून, फक्त पाच जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. डेंगीचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी इमारतींच्या पुनर्बांधणीची कामे सुरू असून, त्यासाठी पालिकेमार्फत बांधकाम ठिकाणी डास उत्पत्ती स्थानांमध्ये साप्ताहिक वेळापत्रकानुसार डासअळी नाशक फवारणी केली जाते. त्याचबरोबर आरोग्यसेवकांमार्फत बांधकामांच्या ठिकाणी मजुरांसाठी नियमित भेटी देऊन तापाचे रुग्ण असल्यास त्यांचे रक्त नमुने घेऊन त्यांना औषधोपचार दिले जातात.
.......................
शहरात नियमित होणारी फवारणी, धुरीकरण सुरू आहे. डासांची भुणभुण ही क्युलेक्स डासांमुळे होत असून, त्‍यामुळे हिवताप व डेंगी हे आजार होत नाहीत. शिवाय हे डास जास्त उपद्रवी नसतात, ते फक्त भुणभुण करीत असतात. शहरात यामुळे डेंगी, मलेरिया रुग्णांची संख्या वाढल्याची किंवा रुग्ण सापडल्याचीही नोंद नाही.
- डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी राष्ट्रीय संयोजक! कॉकरोच जनता पार्टीवर दावा करत निवडणूक आयोगाकडे वकिलाचा अर्ज; CJPचा लोगोही वापरला

Ranveer singh controversy: 45 कोटींचं नुकसान? Don 3 मधून अचानक बाहेर पडला रणवीर? काय घडलं?

विधान परिषदेच्या तिकिटासाठी भाजप नेत्यांनी मांडले मुंबईत ठाण

Latest Marathi News Live Update : सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना 140 हुन अधिक तरुणींना गंडवणाऱ्या भामट्याला अटक

विद्यार्थीनीनं रिचेकिंगला पाठवलं, उत्तरपत्रिका हातात येताच बसला धक्का; पहिलं पानं सोडून बाकीचं लिहिलं कुणी? CBSEचा सावळा गोंधळ

SCROLL FOR NEXT