BJP Party
sakal
जालना: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपमधील इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी मुंबई गाठली आहे. भाजपचे सतीश घाडगे यांनी पाच दिवसांचा मुंबई दौरा केला. ते रविवारी (ता. २४) रात्री परतले. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल हे सध्या मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यानंतर उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.