मुंबई

तुर्भे नाका येथून साडे सहा लाखांचा गांजा जप्त

CD

तुर्भे नाका येथून साडेसहा लाखांचा गांजा जप्त
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी दुपारी तुर्भे नाका येथील एका घरावर छापा मारून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नसीम बानो गनी शेख उर्फ लाली ( वय ५५) या महिलेला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी महिलेच्या घरातून तसेच मारुती एक्सएल-सहा कारमधून तब्बल साडेसहा लाख रुपये किमतीचा गांजा जफ्त केला आहे. पोलिसांनी आता नसीम बानोच्या पतीचा व त्यांना गांजा पुरवणाऱ्या दाम्पत्याचा शोध सुरू केला आहे.
तुर्भे नाका येथे राहणारे शेख दाम्पत्य आपल्या घरातून गांजा व इतर अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरज गोरे व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास तुर्भे नाका येथील शेख दाम्पत्याच्या घरावर छापा मारला. त्यानंतर पोलिसांनी घराची तपासणी केली असता, त्यांच्या घरामध्ये तसेच त्यांच्या मारुती एक्सएल-सहा या कारमध्ये तब्बल सहा लाख ४८ हजार रुपये किमतीचा सहा किलो ४८० ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा फुले व बोंडे असलेला गांजा हा अमली पदार्थ सापडला. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने हा गांजा व कार असा सुमारे १८ लाख ४८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
..................
दाम्पत्यावर कारवाई
नसीम बानो गनी शेख उर्फ लाली व तिचा पती गनी लतिफ शेख हे दोघेही अमली पदार्थ विक्री करण्यात सराईत असून, यापूर्वीदेखील त्यांच्यावर अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अमली पदार्थ विरोधी पथकाने या दाम्पत्याविरोधात एनडीपीएस तसेच बीएनएस १११ नुसार गुन्हा दाखल करून नसीम बानो हिला अटक केली आहे. या शेख दाम्पत्याला ऐरोली येथील शांताबाई करंडेकर व मंगेश करंडेकर हे दोघे गांजा पुरवत असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनासुद्धा गुन्ह्यात सहआरोपी करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
..........................
महापे एमआयडीसीत गांजाविक्रीसाठी आलेला तरुण अटकेत
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : महापे एमआयडीसीच्या हद्दीत गांजाविक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रोशन चंद्रकांत चावरे (वय २३) असे या तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या ताब्यात असलेला सुमारे ७० हजार रुपये किमतीचा एक किलो ३३६ ग्रॅम वजनाचा गांजा जफ्त केला आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेला आरोपी रोशन चावरे हा महापे एमआयडीसीतील अडवली भुतवली येथे राहण्यास असून, तो मजुरीचे काम करतो. सोमवारी सायंकाळी आरोपी रोशन चावरे हा महापे येथील गवळीदेव बस स्टॉपजवळ संशयास्पद फिरत होता. या भागात गस्तीसाठी आलेल्या रबाळे एमआयडीसी पोलिसांना रोशनवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळ असलेल्या कापडी पिशवीची तपासणी केली असता, त्यात एक किलो ३३६ ग्रॅम वजनाचा ओलसर सुखा असा हिरवट रंगाची फुले व बोंडे असलेला गांजा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात एनडीएपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT