स्वागत यात्रेत जिल्हा परिषदेचा चित्ररथ
नावीन्यपूर्ण योजनांची करणार जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ‘संस्कृतीचा महाकुंभ’ म्हणून यंदाच्या स्वागत यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच या स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी नवनवीन संस्था पुढाकर घेत असल्याचे दिसून येत आहे. स्वागत यात्रेत शहरातील विविध संस्था, महाविद्यालये तसेच शाळांसह ठाणे महापालिकेच्या काही विभागांचे चित्ररथ दिसून येत होते; मात्र यंदा या स्वागत यात्रेत पहिल्यांदाच ठाणे जिल्हा परिषदेचा चित्ररथ पाहायला मिळणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विविध नावीन्यपूर्ण योजनांची जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
ठाणे शहराची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी विविध संस्था, प्रशासकीय विभाग तसेच लोकप्रतिनिधींमार्फत विशेष प्रयत्न केले जातात. त्यातच २००१ पासून ठाण्यातील श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने मराठी नववर्षाच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येते. दरवर्षी या यात्रेसोबत नवनवीन संस्था जोडल्या जातात. शहरातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था, महाविद्यालये, शाळा तसेच महापालिका प्रशासनाचादेखील या यात्रेत सहभाग असतो. यंदा या यात्रेचे २५वे वर्षे आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रेत जास्तीत जास्त संस्थांचा सहभाग वाढावा, यासाठी न्यासकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत.
वेळोवेळी संस्थांना केलेल्या आवाहनामुळे यंदाच्या यात्रेत शहरातील नवीन संस्थांचा, शाळांचा आणि महाविद्यालयांचा सहभाग असणार आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या विकासकामांची व राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण योजनांची माहिती शहरातील नागरिकांना व्हावी, यासाठी यंदाच्या वर्षी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयाचा या स्वागत यात्रेत चित्ररथ दिसणार आहे. ठाणे जिल्हा परिषदेचा चित्ररथ यंदा प्रथमच स्वागत यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती न्यासकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.