मुंबई

निखिल नंदकुमार मयेकर

CD

निखिल नंदकुमार मयेकर वाढदिवस विशेष

जनसेवेचा काळ अखंड सुरूच
- ॲड. हर्षल मोरे

सरपंच असावा तर निखिल मयेकर यांच्यासारखा

सरपंचपदाचा कार्यकाळ जरी संपत असला तरी कर्तव्य संपले नाही. यापुढे माझा सेवाकाळ अखंड सुरूच राहील व नागावकरांच्या सेवेसाठी मी यापुढेही तत्‍पर राहील, असा शब्द निखिल मयेकर यांनी नागावकरांना दिला होता. गावातील दिलदार व्यक्तिमत्त्व व स्वच्छ चारित्र्य असल्यामुळे नागावकरांनी ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमताने त्यांना सरपंचपदी निवडून दिले होते. जनतेचा विश्वास सार्थ ठरवताना गावातील अनेक कामे हाती घेतली. त्यातील बहुतांश कामे पूर्ण केली आहेत.
सरपंचपदाचा कार्यकाळ फक्त पाच वर्षांचा होता, मात्र निखिल मयेकर यांनी जनसेवेचा विडा कायमस्वरूपी उचलला असल्याचे सध्या सुरू असलेल्या त्‍यांच्या समाजकार्याकडे बघितल्यावर वाटते. जनतेमध्येही निखिल मयेकर यांची छबी पूर्वीसारखीच आहे. वास्तविक राजकारणी पदावरून उतरल्यावर जनसेवेकडे दुर्लक्ष करतात, असे बोलले जाते, याला निखिल मयेकर अपवाद आहेत. सरपंचपदाचा कार्यकाळ संपला तरी ते अविरत जनसेवेचे व्रत घेऊन काम करीत आहेत.

दिलदार मनाचा माणूस
शिर्डीला जाणारे पदयात्री, वारकरी, सार्वजनिक पूजा, खेळ, सण-उत्सव या सर्वांमध्ये सहभागी होणारा निखिलदादा मयेकर गावातील प्रत्येकाच्या दुःखात आवर्जून उपस्‍थित राहतो. गावातील प्रत्येकाला आपला कुटुंबाचा सदस्य समजून त्याची विचारपूस करून त्याला मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे जनतेचे मत आहे. त्यांच्याविषयी बोलायचे ठरवले तर गावातील लोक त्यांना आपला नेताच नाही तर एक सच्चा माणूस असल्याचे सांगतात.

दांडगी इच्छाशक्‍ती
समाजकार्य करण्यासाठी सरपंचपदाची गरज नसून दांडगी इच्छाशक्ती असणे गरजेचे असते. निखिल मयेकर हे त्यातीलच एक अविरत जनसेवेचे व्रत घेऊन ते काम करीत आहेत. गावाचा आणि गावातील जनतेचा विकास करणे यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रत्येक कार्याला गावकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो, हे त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळेच, असे येथील जनतेचे म्हणणे आहे.

जनतेच्या विश्‍वासामुळे वाढली जबाबदारी
फारसा अनुभव नसताना जनतेने माझ्यावर विश्वास दाखविला, तो पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आली. सदस्यपदाचा १० वर्षांचा अनुभव होता, तो माझ्या कामी आला. नागावमधील सर्वच स्तरातील ग्रामस्थांची प्रगती साधण्याचे भाग्य मला मिळाले, सरपंचपदाचा अर्थ तेव्हा उमगला. सरपंचपदाचे स्वप्न बघणाऱ्या माझ्यासारख्या कित्येक उमेदवारांना प्रत्यक्षात पद मिळाल्यानंतर त्यानंतरची जबाबदारी समजते, असे निखिल मयेकर सांगतात.

कामात समतोल आवश्‍यक
विकासकामे करताना सर्वांचा समतोल साधणे आवश्यक असते. तसेच सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सरकारच्या धोरणानुसार विकासकामे करावी लागतात. काही वेळा मनात असून किंवा गरज असूनही नियमांमुळे विकासकामे करताना अडचणी येतात, परंतु सामान्य नागरिकांना त्यामागील परिस्‍थिती माहीत नसते व विरोधक त्याच गोष्टीचा फायदा घेतात. काही वेळा विकासकामे आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे आपण त्या विभागाला पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही.

‘स्‍वच्छ नागाव, हरित नागाव’
२६ जुलै २०१८ रोजी ‘क्लीन नागाव, ग्रीन नागाव, यही हमारा ड्रिम नागाव’ हे ब्रीदवाक्य ठेवत नागावचे नाव एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे स्वप्न बाळगून मी व माझ्या सहकार्यांच्या टीमने गावाची धुरा हाती घेतली. सुरुवातीला आरोग्य शिबिर, वृक्षरोपण, स्वच्छता मोहीम तसेच मतदान आचारसंहितेमुळे रखडलेली कामे पूर्ण करीत असताना नागावमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्‍या गंभीर असल्‍याचे आढळले. महिलांसाठी विशेष प्रशिक्षण व आरोग्य शिबिरे, नागाव समुद्रकिनारी हायमास्ट लाइट्स, खारगल्ली येथे क्रीडा संकुलाची उभारणी, वैद्य आळी व सोनारपेठ येथे बसथांबा शेड, डासनाशक फवारणी, अशा प्रकारे विविध कार्यक्रम व विकासकामे तेव्हा हाती घेतली. कोरोना काळातही शक्य तेवढे प्रयत्न करून नागावमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी नागरिकांच्या मदतीने प्रयत्न केले.

अनेक प्रकल्‍प मार्गी
माझ्या कार्यकाळात आपल्या ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र मिळावे, असे ध्येय ठेवून त्याप्रमाणे आयएसओ-९००१-२०१५ प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच नागावमधील सुका कचरा व ओला कचरा विलगीकरण व व्यवस्थापनाचा प्रकल्प सुरू केला. पुढील नियोजित नागाव सेल्फी पॉइंट, ब्लु स्टैंग प्रोजेक्ट व समुद्रकिनारा स्वच्छता, असे अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले.


नागावमधील नंदकुमार मयेकर यांचा निखिल हा ज्येष्ठ मुलगा, पण सध्या सर्व गावाचाच मुलगा बनला आहे. गावातील वडीलधारी माणसे निखिलला आपल्या मुलासारखा मानतात, तर मित्रपरिवारात लहान-मोठ्या भावासारखे मानतात. दिलखुलास व समंजस निखिल नेहमी सर्वांमध्ये मिळून मिसळून राहतात. त्यामुळेच त्‍यांनी राजकारणी म्हणून कमी पण समाजकारणी म्हणून नावलौकिक मिळवला आहे. अशा या अष्टपैलू नेतृत्वगुण असलेल्या निखिलदादा मयेकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT